Rakhi sawant-Adil Khan Durrani : राखीचा पती आदिल दुर्रानीला कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी
आदिल खान दुर्रानीला (Adil Khan Durrani) अंधेरी कोर्टाने आज (8 फेब्रुवारी) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Rakhi sawant-Adil Khan Durrani : अभिनेत्री राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती आदिल खान दुर्रानीला (Adil Khan Durrani) अंधेरी (Andheri) कोर्टाने आज (8 फेब्रुवारी) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राखी सावंतनं ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये आदिल खान दुर्रानीच्या विरोधात गुन्हा दाखल केली होती. याच प्रकरणांमध्ये ओशिवरा पोलिसांनी आदिल खानला काल (7 फेब्रुवारी) संध्याकाळी अटक केली होती. त्यानंतर आदिल खानला अंधेरी कोर्टामध्ये आज हजर करण्यात आलं. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. कोर्टात दाखल पुराव्याच्या अनुषंगाने आरोपी आदिल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी राखी सावंतने केलेल्या आरोपाची पडताळणी करून आदिलच्या विरोधात याआधी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर पोलिसांनी आदिलला चौकशीसाठी बोलावलं होते.
राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या विवाहाची माहिती चाहत्यांना दिली. आदिल खान हा बंगळुरुमध्ये राहतो. त्याचा कारचा व्यवसाय आहे. राखीचे आदिलसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
राकेश सावंतने देखील आदिल खान दुर्राणीवर गंभीर आरोप केले आहेत. राखी सावंतच्या भावाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडोमध्ये राकेशने आदिल खान राखीला कसा मारहाण करायचा याबद्दल सांगितले आहे. तो म्हणत आहे,"ज्यादिवशी आमच्या आईचे निधन झाले त्यादिवशीदेखील आदिलने राखीला खूप मारहाण केली".
View this post on Instagram
सोशल मीडियाच्या माध्यामातून राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. विविध कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. बिग बॉस-14 (Bigg Boss-14), नच बलिये, बिग बॉस-15 (Bigg Boss 15) आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. राखी तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: