एक्स्प्लोर
नोटाबंदीबाबत राखी सावंत म्हणते की...

मुंबई: आपल्या बेधडक वक्तव्यांनी कायमच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतनं आता नोटाबंदीबाबतही वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं राखीनं एकप्रकारे कौतुकच केलं आहे. 'आम्ही बरेचसे कलाकार हे चेकनं पेमेंट घेतो. त्यामुळे आपल्याला नोटाबंदीचा फारसा त्रास झालेला नाही.' असं राखीनं म्हटलं आहे. दरम्यान, राखी सावंतची 'राखी इन खाकी' ही वेब सीरीज आली असून आज त्याचा पहिला भाग प्रदर्शित झाला. दुसरीकडे राखी सावंत उत्तर प्रदेशात मायावतींविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचंही तिनं मान्य केलं आहे. संबंधित बातम्या:
आणखी वाचा























