Raju Srivastava : सेल्फीसाठी काहीही! राजू श्रीवास्तव यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी थेट आयसीयूत घुसला चाहता
Raju Shrivastava: एक अज्ञात व्यक्ती आयसीयूमध्ये शिरला आणि राजू श्रीवास्तव यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागला.
Raju Shrivastava: हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना एम्सच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना लवकरात लवकर शुद्ध यावी यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. या सगळ्यादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक अज्ञात व्यक्ती राजू श्रीवास्तव यांना ठेवण्यात आलेल्या आयसीयूमध्ये घुसली आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. मात्र, सुरक्षारक्षकांच्या नजर पडताच त्या व्यक्तीला तिथून हटवण्यात आले. या घटनेनंतर रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सदर प्रकरणामुळे त त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षेची काळजी वाटत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक अज्ञात व्यक्ती आयसीयूमध्ये शिरला आणि राजू श्रीवास्तव यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले आणि त्याला तत्काळ तिथून बाहेर काढण्यात आले. राजूच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाला सुरक्षेची माहिती दिली. आता आयसीयूच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून, परवानगीशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जात नाहीय.
आयसीयूबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात
राजू श्रीवास्तव यांना एम्समध्ये दाखल करून आता 14 दिवस झाले आहेत. त्यांचे चाहते आणि कुटुंबातील लोक राजू लवकर बरे होण्याची वाट पाहत आहेत. राजू श्रीवास्तव यांना अद्याप आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच, संसर्ग टाळण्यासाठी कोणालाही आत प्रवेश दिला जात नाहीय. दरम्यान, सर्वांच्या नजरा चुकवत एका अनोळखी व्यक्तीने राजू यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आयसीयूमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता आयसीयूबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
देशभरातील चाहते करतायत प्रार्थना
जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती. राजू श्रीवास्तव जिममध्ये कसरत करत होते, तिथे ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यावेळी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हापासून राजू श्रीवास्तव बेशुद्ध असून, अद्याप त्यांना शुद्ध आलेली नाही. कॉमेडियनची प्रकृती चिंताजनक असून, सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान राजू यांची अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळले होते. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत.
14व्या दिवशीही बेशुद्धच
राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टपासून सतत लाईफ सपोर्ट सिस्टीमवर म्हणजेच व्हेंटिलेटरवर आहेत. 14व्या दिवशीही त्यांना शुद्ध आलेली नाही. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करून त्यांचा स्टेंट काढला. एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे डॉक्टर नितीश नायक यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
संबंधित बातम्या