Raju Srivastava Health Update : 'ते लढवय्ये आहेत, ही लढाई ते नक्कीच जिंकतील'; राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीनं दिली माहिती
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांनी राजू यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली.
Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती अधिकच बिघडत चालल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी (10 ऑगस्ट) सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर पडले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती बिघडत असल्यानं त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांनी राजू यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली.
काय म्हणाल्या शिखा श्रीवास्तव?
'राजूजींची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्यांचे काम चोखपणे करत आहेत. राजूजी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण व्यवस्थापन दिवसरात्र काम करत आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. राजूजी हे लढवय्ये आहेत, ते ही लढाई नक्कीच जिंकतील. ते लढतील आणि तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी बरे होऊन परत येतील, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे. आम्हाला शुभेच्छा, आशीर्वाद मिळत आहेत आणि बरेच लोक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. मी सर्वांना प्रार्थना करत राहण्याचे आवाहन करू इच्छिते.'
'राजू श्रीवास्तव यांची डॉक्टर हे देवासारखे असतात.ते खूप छान काम करत आहेत. गोष्टी वैद्यकीयदृष्ट्या हाताळल्या जात आहेत आणि ते व्हायला वेळ लागेल. आपल्याला संयमाने लढावे लागेल आणि प्रतीक्षा करावी लागेल. डॉक्टर आणि राजूजी दोघेही भांडत आहेत. लवकरच सर्वांना सकारात्मक परिणाम मिळेल. मी वचन देतो की राजूजी पुन्हा सर्वांचे मनोरंजन करतील. हात जोडून मी सर्वांना विनंती करतो की, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवणे थांबवा. कारण अशा अफवांमुळे डॉक्टरांचे मॉरल डाऊन होते . अशा अफवा त्रास देत आहेत.'
मैंने प्यार किया आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी काम केलं. तसेच 'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला आणि विनोदांना प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: