Rajkummar Rao Net Worth: 'राजकुमार' जगतोय राजाप्रमाणे आयुष्य; एका चित्रपटासाठी घेतोय कोट्यवधींचं मानधन
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याचा नुकताच शाहीविवाह सोहळा पार पडला.
Rajkummar Rao Net Worth : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याचा नुकताच शाहीविवाह सोहळा पार पडला. राजकुमारने पत्रलेखासोबत चंदीगढमध्ये लग्नगाठ बांधली. राजकुमारच्या चित्रपटांमधील अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. राजकुमारच्या हम दो हमारे दो, काय पो छे, न्यूटन, शादी में जरूर आना आणि क्विन या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. जाणून घेऊयात राजकुमारच्या संपत्तीबाबत...
राजकुमारने ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एका रिपोर्टनुसार, राजकुमारकडे सध्या 6 मिलियन डॉलर म्हणजेच 44 करोड रूपये एवढी संपत्ती आहे. राजकुमार एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 4 ते 5 कोटी रूपये घेतो. तसेच ब्रँड इंडोर्समेंटसाठी राजकुमार एका ब्रँडचे 1 कोटी घेतो. Actimaxx, bewakoof.com आणि Cashify या ब्रँडचा राजकुमार ब्रँड अॅम्बेसेडर आहे. राजकुमारकडे अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. एका रिपोर्टनुसार त्याच्याकडे 70 लाख रूपये किंमत असणारी Audi Q7 ही गाडी आहे. तसेच Mercedes CLA 200 ही गाडी देखील lत्याच्याकडे आहे. राजकुमारकडे Harley Davidson Fat Boy ही 19 लाखांची गाडी देखील आहे.
View this post on Instagram
राजकुमार लवकरच ‘बधाई दो’या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच HIT: The First Case या तेलगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये देखील राजकुमार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.