एक्स्प्लोर

Vicky Kaushal : विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केली घोषणा

Vicky Kaushal as Sambhaji Maharaj : विकी कौशल त्याच्या आगामी सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

Raj Thackeray on Vicky Kaushal as Sambhaji Maharaj : मनसेकडून (MNS) दरवर्षी शिवाजी पार्कात दीपोत्सावाचे आयोजन केले जाते. या दीपोत्सवाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित असतात. यंदा विकी कौशल, राजकुमार हिराणी, अभिजीत जोशी, साजिद नाडियादवाला, आशुतोष गोवारीकर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान विकी कौशल  (Vicky Kaushal) त्याच्या आगामी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरेंनी विकी कौशलचं कौतुक केलं आहे. त्यावेळी विकीच्या लूकबद्दल बोलताना ते म्हणाले,"विकी कौशलचा एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विकी कौशल धर्मवीर संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तो खूप मेहनत घेत असून त्याने खरीखुरी दाढी वाढवली आहे".

विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. पण अद्याप या सिनेमाचं नाव समोर आलेलं आहे. 'छावा' असे या सिनेमाचे नाव असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या सिनेमात विकी कौशलसह बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकू शकतात. या सिनेमातील औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अनिल कपूर (Anil Kapoor) यांना विचारणा झाल्याची चर्चा आहे.

विकी कौशलचा 'सॅम बहादुर' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! (Vicky Kaushal Upcoming Movie Sam Bahadur)

विकी कौशल सध्या 'सॅम बहादुर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. मेघना गुलजार यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर आणि पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षकांना आता या सिनेमाची प्रतीक्षा आहे. 'सॅम बहादुर' या सिनेमात नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकिब अयुब आणि कृष्णकांत सिंह बुंदेला महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विकीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमादेखील 22 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. उरी, मसान, राझी, संजू, सरदार उधम, मनमर्जियां, जरा हटके जरा बचके अशा अनेक सिनेमांत विकीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

संबंधित बातम्या

MNS Deepostav : मनसेच्या दीपोत्सवात अभिनेता विक्की कौशलची हजेरी, राज ठाकरेंकडून कौतुक; पाहा फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget