Eknath Shinde Exclusive : बीड प्रकरणी कोणालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे UNCUT
संतोष देशमुखांच्या हत्येतील एकालाही सोडणार नाही, फास्टट्रॅकवर ही केस घेऊन आरोपींना कठोर सजा होईल असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Eknath Shinde Exclusive
100 दिवसांचा आराखड्यामधे आम्ही आमच्यापुढे काय लक्ष आहे आणि आम्ही काय करणार हे सांगतिलं आहे
सावत्र भावांवर लाडक्या बहिणींनी बरोबर लक्ष ठेवत आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली
आमची पूर्ण टीम म्हणून आम्ही काम करत आहोत..
कुणी कार्यालयात नाही म्हणून कार्यरत नाही असं नाही
आम्ही जिथे जातो तिथे आमचं मंत्रालय असतं
संतोष देशमुखांची हत्या वेदनादायी, दुर्दैवी आहे
आम्ही हे अजिबात सहन करणार नाही..मुख्यमंत्र्यांनी सगळे योग्य निर्णय़ घेतले आहे
संतोष देशमुखांच्या हत्येत जो कुणी सहभागी आहे त्याला सोडलं जाणार नाही
केस फास्ट्ट्रॅकवर चालवेल आणि त्यांना फाशी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करू
मंत्रालयात विजिटर्स, आमदारांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमची बैठक झाली