ABP Majha Headlines : 02 PM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
खातेवाटपानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणेंची दांडी, भरणे नाराज असल्याची चर्चा...तर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गैरहजर,भरणेंच्या कार्यालयाची माहिती
राज्य सरकार ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार, कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्याची महसूलमंत्री बावनकुळेची माहिती,
प्रजासत्ताक दिनी होणार प्रत्येक शाळेत संविधान वाचन, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय...
शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबै जिल्हा बँकेतूनही होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, वैयक्तिक खाते उघडण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एसआयटीकडून तपास सुरु, एसआयटी प्रमुख बसवराज तेली केजमध्ये दाखल
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही केला जाऊ शकतो, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली भीती...वाल्मिक कराडला वाचवण्याचाही सल्ला..
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी आपण केली, धनंजय मुंडेंचा दावा, आरोपींना फाशीची शिक्षा मिळण्याचीही मागणी
शरद पवार आणि छगन भुजबळ उद्या एकाच मंचावर येणार, पुण्यातील सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात भुजबळ-पवार एकत्र, दिलीप वळसे पाटलांनाही आमंत्रण
कोल्हापूरच्या कसबा बावड्यात डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती झाली जिवंत,कुटुंबीयांचा दावा, अॅम्ब्युलन्समधून नेताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळं शरीरात दिसल्या पुन्हा हालचाली..