एक्स्प्लोर
अभिनेत्रींचं लैंगिक शोषण, निर्मात्याची ऑस्करमधून हकालपट्टी
‘न्यू यॉर्कर’ने सर्वात अगोदर याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी हार्वीविरोधात आवाज उठवला.
वॉशिंग्टन : हॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते हार्वी विनस्टीन यांची ऑस्कर अकादमीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. 24 पेक्षा जास्त महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा आरोप केला आहे. हार्वी यांच्या जवळपास 80 सिनेमांना आतापर्यंत ऑस्करने सन्मानित करण्यात आलं आहे.
यूएस अकादमी मोशन पिक्चर्स अँड सायन्सेच्या दोन तृतीयांश सदस्यांनी हार्वी यांची हकालपट्टी करण्याच्या बाजूने कौल दिला. ऑस्कर कमेटीतून बाहेर केल्यामुळे आता हार्वी यांना ऑस्करसाठी नामांकन देता येणार नाही किंवा विजेत्यांसाठी मतही देता येणार नाही.
हार्वी यांनी हॉटेलमध्ये बलात्कार केला, असा आरोप प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री रोज मॅकगोव्हानने केला होता. शिवाय अँजेलिना जोली आणि ग्विंथ पॉल्ट्रोव यांचाही आरोप करणाऱ्या महिलांमध्ये समावेश आहे. लैंगिक शोषणानंतरही अनेक अभिनेत्रींनी दबावात येऊन हार्वी विनस्टीन यांच्यासोबत संबंध कायम ठेवले.
हार्वीने अनेक अभिनेत्रींना कामासंदर्भात चर्चेसाठी किंवा पार्टीसाठी हॉटेलात बोलावलं. त्यानंतर मसाज करण्यासाठी दबाव टाकला आणि जबरदस्तीने लैंगिक शोषण केलं, असा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्वीवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे.
‘न्यू यॉर्कर’ने सर्वात अगोदर याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी हार्वीविरोधात आवाज उठवला. हॉलिवूडमध्ये सर्वात मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अँजेलिनानेही हार्वीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement