एक्स्प्लोर
प्रियांका चोप्राने उरकलं गुपचूप लग्न?
सध्या प्रियांका आसममध्ये असून, आपल्या प्रवासातील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमुळेच तिच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
मुंबई : विरानुष्काच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये लग्नसराईचा धडाकाच लागला आहे. सोनम कपूर पुढच्या महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. तर दीपिका पदुकोण देखील या वर्षाअखेरीस लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता प्रियांका चोप्रानेही गुपचूप लग्न उरकल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
प्रियांका सध्या आपल्या हॉलिवूड प्रोजेक्टमधून ब्रेक घेऊन मायदेशी परतली आहे. सध्या ती आसममध्ये असून, आपल्या प्रवासातील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमुळेच तिच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
कारण, इंस्टाग्रामवर तिने शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये तिच्या हातात ब्रेसलेटसारखी वस्तू दिसत आहे. नेटिझन्सच्या मते, ही वस्तू ब्रेसलेट नसून, मंगळसूत्र आहे. आणि तिने गुपचूप लग्न उरकलं आहे.
प्रियांका गेल्या दोन वर्षांपासून हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिने लग्न केल्याची चर्चा खरी असल्यास, तिचा पती कोण? याबाबत सोशल मीडियातून विविध तर्क लढवले जात आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये तिचं नाव हॉलिवूड अभिनेता टॉम हिडिल्सनशी जोडलं जात होतं. 2016 मध्ये एका पुरस्कार वितरण सोहळ्यात ती टॉम हिडिल्सनसोबत दिसली होती. पण दोघेही एकमेकांशी फ्लर्टिंग करत असल्याची नंतरच्या काळात चर्चा होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement