एक्स्प्लोर
बम बम बोल रहा है काशी, प्रियंकाची भोजपुरीत एन्ट्री

मुंबई : प्रियंका चोप्राने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही दमदार पाऊल ठेवलं आहे. मात्र आता प्रियंकाने भोजपुरी चित्रपटसृष्टीतही एन्ट्री केली आहे. तिची निर्मिती असलेला 'बम बम बोल रहा है काशी' गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. प्रियंकाने मनोरंजन विश्वाशी संबंधित अनेक क्षेत्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मराठी चित्रपटासोबतच तिने अन्य काही भाषांमध्येही निर्मितीचा निर्णय घेतला आहे. प्रियंकाच्या पर्पल पेबल पिक्चर्स अंतर्गत या चित्रपटांची निर्मिती झाली आहे. भोजपुरी सुपरस्टार निरहुआ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. काहीच दिवसांपूर्वी प्रियंका परदेशात बेवॉच चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ काढत मायदेशी परतली होती. या कालावधीत तिने तब्बल 100 कोटी रुपये जाहिरातीतून कमवले.
आणखी वाचा























