एक्स्प्लोर
युनिसेफची जागतिक सदिच्छादूत म्हणून प्रियंकाची नियुक्ती

न्यूयॉर्क : बॉलिवूडवर अधिराज्य गाजवल्यानंतर अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिचा मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. परदेशी चित्रपट, मालिकांमध्ये कीर्ती मिळवलेल्या पिग्गी चॉप्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. 'युनिसेफ'ची ग्लोबल गुडविल अॅम्बेसेडर अर्थात जागतिक सदिच्छादूत म्हणून प्रियंकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जगभरातील पीडित लहानग्यांचा आवाज व्हा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी चांगलं भविष्य घडवा, असं आवाहन प्रियंकाने जगभरातील नागरिकांना केलं आहे. फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि 12 वर्षीय ब्रिटीश अभिनेत्री मिली बॉबी ब्राऊन यांनी प्रियंकाच्या नियुक्तीची घोषणा केली. 'लहान मुलांना स्वातंत्र्य मिळावं, हीच माझी इच्छा आहे. विचार करण्याचं स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य.' अशा भावना प्रियंकाने यूएनच्या 70 वर्षपूर्तीच्या सेलिब्रेशनमध्ये व्यक्त केल्या. त्यावेळी संयुक्त राष्ट्रसंघांचे राजनैतिक अधिकारी, सदिच्छादूत आणि काही लहान मुलं उपस्थित होती. 'प्रत्येक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे जगभरातील चिमुरड्यांना हिंसा, पिळवणूक आणि शोषणाचा सामना करावा लागत आहे. या अन्यायाविरोधात एकत्रित लढा देण्याची आवश्यकता आहे.' असं प्रियंका म्हणते.
आणखी वाचा























