एक्स्प्लोर
प्रियांका 100 कोटींच्या घरात बॉयफ्रेंडला पार्टी देणार
प्रियांका सध्या निक जोनासला भारतात घेऊन आली आहे. आज सकाळी प्रियांका आणि निक मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसले. यावेळी प्रियांका कॅमेऱ्याला टाळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि सध्या अमेरिकेत आपल्या अभिनयाची छाप उमटवत असणारी प्रियांका चोप्रा सध्या तिच्या लव्हस्टोरीमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सतत अमेरिकी सिंगर निक जोनाससोबत दिसत आहे.
प्रियांका सध्या निक जोनासला भारतात घेऊन आली आहे. प्रियांका आणि निक मुंबई एअरपोर्टवर सकाळी एकत्र दिसले. यावेळी प्रियांका कॅमेऱ्याला टाळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
याआधीच दोघांनीही आपलं रिलेशन जाहीरपणे मान्य केलं आहे. ते एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. प्रियांका मुंबईतील आपल्या 100 कोटींच्या आलिशान घरामध्ये एक पार्टी करणार असल्याचं समजतंय. याच पार्टीत प्रियांका निक जोनासची आपल्या मित्रांना ओळख करुन देईल. दरम्यान, एका घरगुती कार्यक्रमात प्रियांकाने निक जोनासच्या फॅमिलीचीही भेट घेतली होती. काही मीडिया रिपोर्टसनुसार, प्रियांका आणि निक जोनासची ओळख ‘क्वांटिको’ या प्रियंकाच्या शोमध्येच झाली होती. मागील वर्षी डिसेंबरमध्ये निक जोनासने ने 'जुमांजी : वेलकम टू द जंगल'च्या प्रमोशनसाठी प्रियांकाकडे भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. कोण आहे निक जोनास? निक जोनास हा अमेरिकन सिंगर आहे. त्याचा पहिला अल्बम 2004 साली प्रसिद्ध झाला. गायनासोबतच गीतकार आणि अभिनेता म्हणूनही निक जोनास अमेरिकेत ओळखला जातो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement