एक्स्प्लोर
ओम पुरी यांच्या मृत्यूची चौकशी होणार?
मुंबई : प्रख्यात अभिनेते ओम पुरी यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते 66 वर्षाचे होते. मात्र ओम पुरी यांच्या मृत्यूची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन
पोलिसांनी ओम पुरी यांच्या घराचा पंचनामा केला. प्राथमिकदृष्ट्या ओम पुरी यांच्या मृत्यू नैसर्गिक वाटत आहे. परंतु सुत्रांच्या माहितीनुसार, "पुरी यांच्या डोक्याच्या मागे दुखापत झाली आहे. ही दुखापत पडल्यामुळे झाली असेल किंवा कोणीतरी मारल्यामुळे. ओम पुरी अतिशय मद्यपान करत असंत. कालही त्यांनी मद्यपान केलं होतं. त्यांच्या घरात दारुच्या बाटल्या मिळाल्या होत्या."ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांची कारकीर्द
"आम्ही सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करणार आहोत. येणाऱ्या-जाणाऱ्यांचीही चौकशी होणार आहे. गरज पडल्यास पत्नी नंदिता पुरी यांचीही चौकशी केली जाईल," असंही पोलिसांनी सांगितलं.ओम पुरी यांचे 10 गाजलेले सिनेमे
दरम्यान, ओम पुरी काल (गुरुवार) निर्माता खालिद रिझवी यांच्यासोबत होते. त्यांनी ओम पुरी यांचा गुरुवारचा दिनक्रमच सांगितला. त्यांच्या माहितीनुसार, "संध्याकाळी मला फोन करुन घरी बोलावलं. मी काल संध्याकाळी साडेपाच वाजता ओम पुरी यांच्या घरी गेलो होतो. तिथे त्यांची मुलाखत सुरु होती. मुलाखत संपल्यानंतर ओम पुरींनी मला एका कार्यक्रमाला जायचं असल्याचं सांगितलं. तसंच मला सोबत यायला सांगितलं. पण मी नकार दिल्यावर पुरींनी गाडीने सोडण्यास सांगितलं. त्यानंतर पहिल्यांदा ते त्रिशूल या त्यांच्या घरी गेले, जिथे नंदिता पुरी राहतात. यावेळी पत्नी नंदितासोबत त्यांचं जोरदार भांडण झालं. ते मुलगा इशांतला भेटण्यासाठी गेले होते. खाली येऊन त्यांनी इशांतला कॉल केला, पण तो कोणत्यातरी पार्टीत होता. त्यानंतर ते गाडीतच त्याची वाट पाहू लागले. यादरम्यान त्यांनी पुन्हा मद्यपानही केलं. यानंतर आम्ही मनोज पहावाच्या घरी गेलो. तिथेही पैशांवरुन त्याचा कोणाशी तरी वाद सुरु होता. मी बाहेर होतो, त्यामुळे ते कोणाशी भांडत होते, हे मला माहित नाही. ते बाहेर आले तेव्हा फारच भावुक झाले होते. त्यानंतर मी त्यांना सोडलं. पण कारमध्ये त्यांचं पाकिट पडलं होतं. फारच उशिर झाल्याने त्यांचं पाकिट परत करण्यासाठी ड्रायव्हरला सकाळी त्यांच्याकडे पाठवलं. पण ते दरवाजा उघडत नसल्याचं ड्रायव्हरने सांगितलं."अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement