Phakaat Teaser: 'फकाट' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज; हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे प्रमुख भूमिकेत
'फकाट' चित्रपटाच्या माध्यमातून हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि सुयोग गोऱ्हे (Suyog Gorhe) ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Phakaat Teaser: प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव (Shreyash Jadhav) यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'फकाट' (Phakaat) या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा घालायला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे. वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, 19 एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या 'फकाट' च्या निमित्ताने हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि सुयोग गोऱ्हे (Suyog Gorhe) ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय या चित्रपटात अविनाश नारकर, नितीश चव्हाण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाच्या नावावरूनच हा अफलातून चित्रपट असल्याचे दिसतेय. टीझरच्या सुरुवातीलाच आतंकवादी आणि सैनिकांची चकमक, अंगावर शहारे आणणारा गोळीबाराचा आवाज आणि या दरम्यान एक हायली कॉन्फिडेन्शिअल माहिती असणारी एल. ओ. सी. फाईल उघडताना दिसत असून, यात सैनिकाच्या वेशात नितीश चव्हाण दिसत आहे. एका बाजूला असे संवेदनशील चित्र दिसत असतानाच दुसऱ्या बाजूला हेमंत ढोमे (सलीम) आणि सुयोग गोऱ्हे (राजू) या जिगरी दोस्तांची धमाल, मस्तीही दिसत आहे. अचानक या दोघांच्या हातात ती फाईल पडते आणि त्यांच्या डोक्यात एक जबरदस्त कल्पना येते. या स्वप्नांच्या दुनियेत जगत असतानाच त्यांच्या आयुष्यात पुढे काय काय घटना घडतात, त्यातून ते दोघे कसा मार्ग काढतात, पुढे त्या फाईलचं काय होतं? ती फाईल घेऊन ते दोघे कुठे जातात? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा चित्रपट पाहिल्यावरच होणार आहे.
पाहा टीझर
View this post on Instagram
दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, ''ॲक्शन आणि कॅामेडीचा भन्नाट मेळ असलेल्या 'फकाट'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून कौटुंबिक, निखळ मनोरंजन करणारा आणि हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा असलेला चित्रपट आहे. सरतेशेवटी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे. एका वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. १९ एप्रिलपर्यंत हळूहळू एक एक गोष्टी समोर येतीलच.''
महत्त्वाच्या इतर बातम्या :