एक्स्प्लोर

Adipurush : जय पवनपुत्र श्री हनुमान! 'आदिपुरुष' सिनेमातील हनुमानाचा फर्स्ट लुक आऊट; मराठमोळ्या देवदत्त नागेने वेधलं लक्ष

Hanuman Jayanti 2023 : आज हनुमान जयंतीचे औचित्य साधत 'आदिपुरुष' सिनेमातील हनुमानाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे.

Devdatta Nage First Look As Hanuman : प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) बहुचर्चित 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. आज हनुमान जयंतीचे (Hanuman Jayanti 2023) औचित्य साधत या सिनेमातील हनुमानाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे.

'आदिपुरुष' सिनेमातील हनुमानाचा फर्स्ट लुक आऊट!

'आदिपुरुष' या सिनेमात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे (Devdatta Nage) हनुमानाच्या भूमिकेत आहे. देवदत्तने या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की,"श्रीराम के भक्त और रामकथा के प्राण... जय पवनपुत्र श्री हनुमान!". आज हनुमान जयंतीनिमित्त 'आदिपुरुष' या सिनेमातील हनुमानाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Devdatta Gajanan Nage (@devdatta.g.nage)

हनुमानाच्या फर्स्ट लुकआधी रामनवमीला 'आदिपुरुष' सिनेमाचं एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यात प्रभास रामाच्या भूमिकेत दिसत होता. तर क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसत होती. आज हनुमान जयंतीचं औचित्य साधत रामभक्त हनुमानाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे.

हिंदी सिनेसृष्टी पुन्हा गाजवण्यासाठी देवदत्त नागे सज्ज!

'आदिपुरुष' या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी देवदत्त नागे सज्ज आहे. याआधी बॉलिवूडच्या 'तान्हाजी' या गाजलेल्या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आला होता. देवदत्तने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. यात 'जय मल्हार', 'डॉक्टर डॉन', 'देवयानी', 'बाजीराव मस्तानी' या मालिकांचा समावेश आहे. जय मल्हार' या मालिकेमुळे तो घराघरांत पोहोचला आणि त्याच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. 

'आदिपुरुष' कधी होणार रिलीज? (Adipurush Release Date)

'आदिपुरुष' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण तरीही एकीकडे या सिनेमाला विरोध होत असताना दुसरीकडे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 16 जूनला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मराठमोळ्या ओम राऊतने (Om Raut) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

संबंधित बातम्या

Adipurush Teaser: 'आदिपुरुष' मध्ये हा मराठमोळा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका; मराठी मालिका आणि चित्रपटांमधून आलाय प्रेक्षकांच्या भेटीस

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget