एक्स्प्लोर
किंग खानच्या 'झिरो' चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा
व्हीएफएक्सद्वारे एका दृश्यातील 'ती' कृपाणही झाकण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणाला याबद्दल आक्षेप असण्याची गरज नाही, असं सिनेमाच्या निर्मात्यांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करुन सांगितलं.
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुखचा आगामी चित्रपट 'झिरो'ला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली होती.
व्हीएफएक्सद्वारे एका दृश्यातील 'ती' कृपाणही झाकण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणाला याबद्दल आक्षेप असण्याची गरज नाही, असं सिनेमाच्या निर्मात्यांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करुन सांगितलं.
या सिनेमातील एका दृश्यात शाहरुखने 'कृपाण' (छोटं शस्त्र) धारण केलं आहे. या प्रकारमुळे शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वकील अमृतपालसिंह खालसा यांनी ही याचिका दाखल केली होती.
या याचिकेत अभिनेता शाहरुख खान, सिनेमाच्या निर्मात्या गौरी खान आणि करुणा बडवाल, दिग्दर्शक आनंद एल. राय आणि रेड चिलीज प्रायव्हेट लिमिटेड आणि या सिनेमाला सर्टिफिकेट देणाऱ्या सीबीएफसीलाही प्रतिवादी करुन त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कृपाणचं ऐतिहासिक महत्त्व फार मोठं आहे. तसेच शीख संस्कृतीत त्याला विशेष स्थान आहे. कुणीही ही कृपाण म्हणजेच छोटेखानी शस्त्र धारण करु शकत नाही. त्यासाठी काही धार्मिक विधी करुन घेणं आवश्यक असतं, असा दावा या याचिकेतून करण्यात आला.
या सिनेमाचं एक पोस्टरही लाँच करण्यात आलं आहे. ज्यात चड्डी आणि बनियान घातलेला बुटका शाहरुख गळ्यात नोटांची माळ आणि अंगावर 'कृपाण' धारण केलेला दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हायकोर्टाने सीबीएफसीला निर्देश देत ही आक्षेपार्ह दृश्यं सिनेमातून हटवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. मात्र या दृश्यात दाखवलेलं ते शस्त्र म्हणजे कृपाण नसल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement