Ali Sethi: पसूरी गायक अली सेठीनं लग्नाच्या चर्चेवर सोडलं मौन; पोस्ट शेअर करत म्हणाला...
Ali Sethi: लग्नाच्या चर्चेवर अली सेठीनं मौन सोडलं आहे. त्यानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

Ali Sethi: पाकिस्तानी गायक अली सेठीच्या (Ali Sethi) लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्यानं न्यूयॉर्कमधील चित्रकार सलमान तूरशी लग्न केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. आता या लग्नाच्या चर्चेवर अली सेठीनं मौन सोडलं आहे. अलीनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन ही अफवा असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.
गायक अली सेठीने इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले, "मी विवाहित नाही. ही अफवा कोणी सुरू केली हे मला माहित नाही, परंतु ही कदाचित मला माझ्या पानीया या नवीन रिलीजच्या प्रमोशनसाठी मदत करेल." या इन्स्टा स्टोरीमध्ये अलीने त्याच्या लेटेस्ट गाण्याची लिंक देखील शेअर केली आहे.

जाणून घ्या अली सेठीबद्दल...
अली सेठी (Ali Sethi) हा पाकिस्तानी गायक, गीतकार, संगीतकार आणि लेखक आहे. त्याच्या 'द विश मेकर' या पहिल्या कादंबरीमुळे लोकप्रिय झाला. ही कादंबरी 2009 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर 2012 मध्ये मीरा नायरच्या 'द रिलकंट फंडामेंटलिस्ट' या चित्रपटातील 'दिल जलाने की बात करते हो' या गाण्याने त्यानं गायक म्हणून करिअरला सुरुवात केली. 2015 मध्ये त्याच्या कोक स्टुडिओ पाकिस्तानमधील पंजाबी लोकगीत 'उमराँ लंगियां'ने प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळवली. त्याचे 'पसूरी' हे गाणे भारतात चांगलेच गाजले.
अली सेठी हा त्याच्या गाण्यांची माहिती सोशल मीडियावर देत असतो. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर 485K फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
अलीच्या गाण्याचा रिमेक
पाकिस्तानी गायक अली सेठी (Ali Sethi) आणि शेह गिल (Shae Gill) यांचे 'पसूरी' (Pasoori) हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या गाण्यावरील रिल्स अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत होते. 'पसूरी' या गाण्याचा हिंदी रिमेक देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. अरिजीत सिंह आणि तुलसी कुमार यांनी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटातील 'पसूरी नू' हे गायलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:























