फुलराणी बदलली, श्रद्धाऐवजी परिणिती साकारणार सायना नेहवालची भूमिका
सप्टेंबर 29 ला या फिल्मचं फस्ट लूक रिलीज झालं, त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्रा श्रद्धा कपूर हिला सायनाच्या रोलमध्ये पाहायला मिळालं, पण काही दिवसांपूर्वी श्रद्धाची रिप्लेसमेंट परिणितीसोबत झाल्याचं दिसून आलं.
मुंबई: दिग्दर्शक अमोल गुप्ते यांचा सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला सिनेमागृहात येतोय. अमोल गुप्ते यांनी यापूर्वी तारे जमीं पर सारखा सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिला, त्यामुळे हा जरी सायनाचा बायोपिक असला तरी लोकांना तारे जमीं पर पाहता अमोल यांच्याकडून फार अपेक्षा असेल.
भारताची फुलराणी बॅडमिंटपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. सप्टेंबर 29 ला या फिल्मचं फस्ट लूक रिलीज झालं, त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्रा श्रद्धा कपूर हिला सायनाच्या रोलमध्ये पाहायला मिळालं, पण काही दिवसांपूर्वी श्रद्धाची रिप्लेसमेंट झाल्याचं पाहायला मिळालं. श्रद्धा कपूरने इतर सिनेमांना प्राधान्य दिलं, त्यामुळे या चित्रपटासाठी जवळपास शूटिंग वर्षभर लांबलं होतं. दुसरा पर्याय शोधण्याऐवजी फिल्म क्रूकडे पर्यास नव्हता. त्यामुळे सुप्रसिद्ध अभिनेत्री परिणिती चोप्रा आपल्याला आता सायनाचं पात्र साकारताना दिसणार आहे. सायना नेहवालने आज तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन परिणीतीला शुभेच्छा दिल्या. परिणीतीसोबत काम करण्याची इच्छा आणि टीमलाही शुभेच्छाही सायनाने ट्वीटमार्फत व्यक्त केल्या.
गेले सहा महिने परिणिती सायना नेहवालसारखा सराव करतेय. भारताचा ऑलिम्पिकपटू ईशान नकवी तिचं कोर्टवरील ट्रेनिंग घेत आहे. तिच्या कोचिंगची जबाबदारी ईशानवर आणि भारताला अनेक बॅडमिंटन चॅम्पियन्स दिले अशा सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीचे सर्वेसर्वा श्रीकांत वाड यांच्यावर आहे. श्रीकांत वाड हे सायनाचे पहिले वहिले कोच आहेत. सायना 1998 साली ठाण्यातील प्रसिद्ध सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीमध्ये ती ट्रेनिंग घेत होती. त्याच कोर्टवर परिणितीनेही ट्रेनिंग घेतलं.
ऑलिम्पिक गेम्स 2020 च्या जुलै महिन्यात हेण्याची शक्यता आहे, त्यामुळे या चित्रपटाचा मुहूर्त हाच असू शकण्याची शक्यता आहे.