Lee Sun-Kyun Death: ऑस्कर विजेता चित्रपट 'पॅरासाइट' फेम ली सन-क्यूनचं निधन; कारमध्ये आढळला मृतदेह
Lee Sun-Kyun Death: अभिनेते ली सन-क्यूनचे (Lee Sun-Kyun) निधन झाले. वयाच्या 48 व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला.
Lee Sun-Kyun Death: ऑस्कर विजेते चित्रपट 'पॅरासाइट' (Parasite) मधील प्रसिद्ध दक्षिण कोरियातील अभिनेते ली सन-क्यूनचे (Lee Sun-Kyun) निधन झाले. वयाच्या 48 व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला. योनहॅप या न्यूज एजन्सीने बुधवारी ही माहिती दिली. अवैध औषधांविरोधात सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ली सन-क्यूनच्या निधनाची बातमी समोर आली आहे. ली सन-क्यूनची देखील कथित ड्रग्स प्रकरणी चौकशी सुरु होती.
सुसाईड नोट सापडली (Lee Sun-Kyun Death)
योनहॅप न्यूज एजन्सीनुसार, ली सन-क्यूनच्या पत्नीने ली सन-क्यून हा बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती आणि सांगितले होते की, ली सन-क्यूच्या घरी एक सुसाईड नोट सोडली होती, त्यानंतर लीचा शोध घेतला असता तो कारमध्ये मृत आढळला.
पॅरासाइट चित्रपटामुळे मिळाली विशेष लोकप्रियता
1975 मध्ये जन्मलेल्या ली सन-क्यूनला "पॅरासाइट" या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात ली सन-क्यूननं श्रीमंत कुटुंबातील व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियाच्या चित्रपटसृष्टीत त्यांनी ली सन-क्यूननं विशेष ओळख निर्माण केली होती. 2012 चा थ्रिलर "हेल्पलेस" आणि 2014 चा हिट "ऑल अबाउट माय वाईफ" सारख्या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या दमदार भूमिकांनी ली सन-क्यूननं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं होतं.
ली सन-क्यूनने अॅपल टीव्ही+ ची कोरियाई भाषेतील "डॉ. ब्रेन" या ऑनरनल सीरीजमध्ये लीड रोल प्ले केला होता. या वेब शोचा प्रीमियर 2021 मध्ये झाला.सहा भागांचा हा साय-फाय थ्रिलर शो कोह से-वोन या कट्टर न्यूरोलॉजिस्टच्या भोवती फिरतो जो रहस्यांचा शोध घेतो.
ली सन-क्यूनच्या निधनाच्या बातमीने दक्षिण कोरियाच्या चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.ली सन-क्यूनच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे.
अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी दक्षिण कोरियात कठोर शिक्षा
ऑक्टोबर महिन्यापासून पोलीस ली सन क्यूनची अंमली पदार्थाच्या वापराच्या संशयावरून चौकशी करत होते. दक्षिण कोरिया हा त्याच्या कठोर ड्रग्ज कायद्यांसाठी ओळखला जातो. अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी तिथे कठोर दंड आकारतो. या प्रकरणातील गुन्हेगारांना कमीत कमी सहा महिन्यांसाठी तुरुंगवास भोगावा लागू शकतो, पुनरावृत्ती केलेल्या गुन्हेगारांना अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्यांना 14 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागतो.
संबंधित बातम्या:
Neel Nanda Death: स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचं निधन;वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास