Neel Nanda Death: स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचं निधन;वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Neel Nanda Passed Away: स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचं निधन झालं आहे. वयाच्या 32 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला.
Neel Nanda Passed Away: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदानं (Neel Nanda) वयाच्या 32 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नील नंदाच्या निधनानं चाहत्यांना धक्का बसला आहे. नीलच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
नीलच्या मृत्यूची माहिती त्याचा मॅनेजर ग्रेग वाईजनं दिली आहे. नील हा ग्रेग वाईजचा गेल्या 11 वर्षांपासून क्लायंट होता. ग्रेग वाईजने सांगितले की, तो नीलला 19 वर्षांचा असल्यापासून ओळखतो. 24 डिसेंबर रोजी दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये ग्रेग वाईज म्हणाला, "11 वर्षे माझे क्लायंट असलेल्या नील नंदा यांचे निधन झाले आहे हे सांगताना अतिशय दुःख होत आहे. नील मूळचा भारतीय होता आणि तो लॉस एंजेलिसमध्ये राहत होता. त्याला कॉमेडी करण्याची खूप आवड होती, म्हणूनच त्यानी त्यामध्ये करिअर केलं. त्याच्या कॉमेडी व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
View this post on Instagram
नीलच्या मृत्यूनं त्याचे चाहते आणि त्याचे मित्र खूप दु:खी झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. विविध कॉमेडी क्लब आणि कॉमेडी विश्वातील लोकांनी सोशल मीडियावर नंदा यांना श्रद्धांजली वाहिली. द पोर्ट या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करुन नीलला श्रद्धांजली वाहण्यात आली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "नील नंदा यांना आम्ही खूप जड अंतःकरणाने अलविदा म्हणतो. या बातमीने धक्का बसला. रेस्ट इन पीस नील. विनोदी जगतातील सर्वात सकारात्मक व्यक्ती. हे आपल्या समाजाचे सर्वात मोठे नुकसान आहे. आमच्या स्टेज आणि पियानो यांचा वापर करुन त्यांना खास केल्याबद्दल नील तुझे आभार. तू खूप लवकर गेला."
नील जिमी किमेल लाइव्ह आणि कॉमेडी सेंट्रलच्या अॅडम डिव्हाईनच्या हाऊस पार्टीमुळे प्रसिद्ध झाला. नीलच्या निधनानं आता त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या: