Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी टॉलिवूडमध्ये करणार पदार्पण
Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.
Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) लवकरच टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणच्या आगामी Bhavadeeyudu Bhagat Singh या सिनेमात पंकज त्रिपाठी पवन कल्याणसोबत दिसणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पवन कल्याणच्या Bhavadeeyudu Bhagat Singh सिनेमासाठी पंकज त्रिपाठीचे नाव निश्चित झाले आहे. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. पवन कल्याण हा साऊथचा सुपरस्टार असून त्यांचे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. त्यामुळे Bhavadeeyudu Bhagat Singh हा सिनेमादेखील चांगली कमाई करेल.
View this post on Instagram
नुकताच पवन कल्याणचा 'भीमला नायक' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमानेदेखील चांगलीच कमाई केली होती. पवन कल्याणच्या आगामी सिनेमात पंकज त्रिपाठीसह पूजा हेगडेदेखील दिसणार आहे.
संबंधित बातम्या























