(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींच्या मेव्हण्याचा अपघाती मृत्यू; बहिणीची प्रकृती चिंताजनक
Pankaj Tripathi Brother in Law Dies : लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या मेव्हण्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. तसेच बहिणीची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. झारखंडमधील धनबाद शहरात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Pankaj Tripathi : सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या मेव्हण्याचं अपघाती निधन (Pankaj Tripathi Brother in Law Dies Road Accident) झालं आहे. तसेच त्यांच्या बहिणीची प्रकृतीदेखील चिंताजनक आहे. झारखंडच्या (Jharkhand) धनबादमध्ये त्यांच्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे. धनबाद शहरात अभिनेत्याच्या बहिणीवर उपचार सुरू आहेत. कार वेगात असल्याने दुभागकावर धडकल्याची माहिती मिळाली आहे. त्रिपाठी यांची बहिण आणि मेव्हणा गोपालगंजहून (Gopalganj) कोलकात्याला (Kolkata) जात असताना हा अपघात झाला आहे. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्रिपाठी यांचे मेव्हणे मुन्ना तिवारी (Munna Tiwari) यांचा मृत्यू झाला. तर बहिण सरिता तिवारी (Savita Tiwari)यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंकज त्रिपाठी तातडीने धनबादकडे (Dhanbad) रवाना झाले आहेत.
पंकज त्रिपाठी यांचा मेव्हणा राजेश तिवारी (Rajesh Tiwari) उर्फ मुन्ना तिवारी कार चालवत होता. तर बहीण सविता तिवारी या कारमध्ये बसलेल्या होत्या. दरम्यान धनबाद शहरात त्यांचा भीषण अपघात झाला. दोघांनाही तातडीने धनबाद येथील एसएनएमसीएच (SNMCH) रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मुन्ना तिवारी यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. बहीण सरिता यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर
पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"माझा मित्र, अभिनेता आणि भाऊ पंकज त्रिपाठीच्या मेव्हण्याचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना".
पंकज त्रिपाठी यांचा मेव्हणा राजेश तिवारी हा चित्तरंजन येथे रेल्वेत काम करत होता. राजेश तिवारी हा चित्तरंजन येथे रेल्वेत काम करत होता. त्यांची ड्युटी रेल्वेच्या जीएम कार्यालयात होती. सुट्टीसाठी ते गोपालगंज येथील त्यांच्या घरी गेले होते. गोपालगंज येथून परतत असताना हा अपघात झाला. पंकज त्रिपाठी आता धनबादमध्ये रवाना झाले आहेत.
कोण आहे पंकज त्रिपाठी? (Who is Pankaj Tripathi)
पंकज त्रिपाठी हे बॉलिवूड आणि ओटीटी विश्वातील लोकप्रिय नाव आहे. आतापर्यंत त्यांनी 500 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पंकज त्रिपाठी यांचे फुक्रे, मसान, बरेली की बर्फी, न्यूटन, स्त्री, मिमी असे अनेक चित्रपट चांगलेच गाजले आहेत. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या