एक्स्प्लोर
सर्जरी नाही केली, मग काजोल गोरी कशी झाली? अभिनेत्रीचं ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर
Kajol Trolled For Skin : बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कधी-कधी ते ट्रोलही होतात. काजोलही तिच्या सावळ्या रंगामुळे ट्रोल झाली होती.

Kajol Trolled For Skin How Kajol's Skin Got Fair
1/11

Kajol Reaction on Trolls For Skin Color : बॉलिवूड अभिनेत्री काजोल 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
2/11

काजोलने तिच्या फिल्मी करियरची सरुवात ‘बेखुदी’ चित्रपटापासून केली होती. पण, तिला खरी ओळख ‘बाजीगर’ चित्रपटामुळे मिळाली.
3/11

शाहरुख खानसोबत ‘बाजीगर’ चित्रपटातील मुख्य भूमिकेनंतर काजोलच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि ती टॉप अभिनेत्री बनली.
4/11

टॉप अभिनेत्री असूनही काजोलला अनेक वेळा ट्रोल केलं गेलं आहे. काजोलला तिच्या सावळ्या रंगामुळे अनेकदा ट्रोल व्हावं लागलं आहे.
5/11

काजोलला तिच्या लूक्समुळे अनेक वेळा ट्रोल केलं जातं. बहुतेक वेळा तिला नेटकरी विचारतात की, आधी तू सावळी होतीस, आता गोरी कशी झालीस? यावर काजोलने ट्रोलर्सला चांगलं उत्तर दिलं होतं.
6/11

अनेकांना हा प्रश्न सतावतो की, काजोल आधी सावळी होती, मग आता तिने असं काय केलं, ज्यामुळे ती गोरी झाली आहे. याचं उत्तर स्व:त काजोलने दिलं होतं.
7/11

अभिनेत्री काजोलने ट्रोल्सवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आता ही खूप साधारण बाब झाली आहे, मी ट्रोल्सला गंभीरपणे घेत नाही.
8/11

काजोलच्या सावळ्या रंगावर प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर देताना काजोलने सांगितलं की, तिने त्वचेवर कोणतीही शस्त्रक्रिया केलेली नाही, ती फक्त आता उन्हापासून दूर राहते, त्यामुळे टॅन होत नाही. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं होतं.
9/11

काजोलने यावेळी सांगितलं की, तिने स्किन व्हाइटनिंग सर्जरी नाही केली, तर ही फक्त घरी राहण्याच्या सर्जरी आहे म्हणजेच घरी राहण्याचा परिणाम असल्याचं तिने सांगितलं.
10/11

काजोलने एक वेळा तिच्या संपूर्ण चेहरा झाकलेला फोटो शेअर करत ट्रोलर्सला निशाण्यावर घेत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, त्या सर्वांसाठी जे मला विचारतात की, मी इतकी गोरी कशी झाले... sunblocked #spfunbeatable...'
11/11

अभिनेत्री काजोल अलिकडेच 'दो पत्ती' चित्रपटात दिसली होती.
Published at : 26 Nov 2024 07:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
