(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद का सोडले? निवडणूक आयोगाने सांगितलं कारण
Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी यांनी राष्ट्रीय आयकॉन पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात यामागचे कारण
Pankaj Tripathi: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद सोडले आहे. याची माहिती निवडणूक आयोगानं ट्विटरवर दिली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंकज त्रिपाठी यांनी राष्ट्रीय आयकॉन पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात यामागचे कारण
ऑक्टोबर 2022 मध्ये, निवडणूक आयोगाने पंकज त्रिपाठी यांची राष्ट्रीय आयकॉन या पदावर नियुक्ती केली होती. आता पंकज त्रिपाठी यांनी हे पद सोडलं आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंकज त्रिपाठी यांच्या आगामी चित्रपटातील भूमिकेचा देखील उल्लेख केला आहे.
निवडणूक आयोगाचे ट्वीट
निवडणूक आयोगाने ट्वीटमध्ये लिहिलं, एका आगामी चित्रपटात राजकीय नेत्यांची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी एमओयूच्या अटींनुसार ECI च्या नॅशनल आयकॉन पद सोडलं आहे. ऑक्टोबर 2022 पासून मतदार जागरूकता आणि SVEEP मध्ये त्यांनी दिलेल्या प्रभावी योगदानाबद्दल ECI कृतज्ञता व्यक्त करते. "पंकज त्रिपाठी हे 'मैं अटल हूं' या बायोपिकमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारत आहे.
Acknowledging his role as a political leader in an upcoming film, actor @PankajTripathi has voluntarily stepped down as #ECI National Icon as per terms of MoU.
— Spokesperson ECI (@SpokespersonECI) January 11, 2024
#ECI expresses gratitude for his impactful contribution to voter awareness & #SVEEP since Oct 2022 pic.twitter.com/83Ols8B9TY
सध्या पंकज त्रिपाठी त्याच्या 'मैं अटल हूं' या त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये, निवडणूक आयोगाने त्यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती केली. नुकतेच त्यांनी आपल्या राजकारण या विषयाच्या आवडीबद्दल सांगितले होते, त्यामुळे आता त्यांनी स्वतः राष्ट्रीय आयकॉन या पदावरून माघार घेतली आहे.
कधी रिलीज होणार 'मैं अटल हूं' ?
'मैं अटल हूं' हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधवने केले आहे.या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: