एक्स्प्लोर
'सिंघम अगेन', 'भूल भुलैया 3' यांच्यासोबतच गुपचूप आला 'हा' चित्रपट; तब्बल 300 कोटींचा गल्ला जमवला, IMDB वरही मिळालंय तगडं रेटिंग
यावर्षी दिवाळीला 'सिंघम अगेन', 'भूल भुलैया 3' हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही मेगाबजेट चित्रपट, 'सिंघम अगेन' 250 कोटी रुपयांमध्ये, तर 'भूल भुलैया 3' 150 कोटी रुपयांमध्ये बनला.
Amaran action thriller Film
1/8

दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि अजूनही दोन्ही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चालू आहेत.
2/8

'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' सोबत आणखी एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला, जो अजूनही थिएटरमध्ये आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट ॲक्शन थ्रिलर आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 207 कोटी रुपये आणि जगभरात 312.25 कोटी रुपयांची कमाई केली.
3/8

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'सिंघम अगेन'नं 24 दिवसांत 240 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 'सिंघम अगेन'च्या संपूर्ण जगभरातील कमाईबाबत बोलायचं झालं तर, चित्रपटानं वर्ल्डवाईल्ड 392.47 कोटी रुपये कमावले आहेत.
4/8

तर, कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन स्टारर 'भूल भुलैया 3' नं 24 दिवसांत भारतात 247.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आहे. या हॉरर थ्रिलरचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं होतं.
5/8

दिवाळीच्या दिवशीच या दोन चित्रपटांसोबत 'अमरन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.शिवकार्तिकेयने आर्मी ऑफिसर मेजर मुकुंद वरदराजनची भूमिका साकारली आहे, तर साई पल्लवीनं त्याची पत्नी इंदू रेबेका वर्गीसची भूमिका साकारली आहे.
6/8

राहुल बोस यांनी कर्नलची भूमिका साकारली आहे. त्याचे निर्माते कमल हासन आहेत. हा चित्रपट 'इंडियाज मोस्ट फियरलेस: ट्रू स्टोरी ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज' या पुस्तकावर आधारित आहे. हे पुस्तक शिव आरूर आणि राहुल सिंह यांनी लिहिले आहे.
7/8

'अमरन' हा चित्रपट मुळात तमिळमध्ये बनला आहे. हा चित्रपट कन्नड, हिंदी, मल्याळमसह अनेक भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित झाला. सकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने 25 दिवसांत भारतात 207.70 कोटी रुपये कमावले.
8/8

'अमरन'ने जगभरात 312.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वर्षी रिलीज झालेला हा पहिला तमिळ चित्रपट आहे, ज्यानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.
Published at : 27 Nov 2024 08:08 AM (IST)
आणखी पाहा






















