Neha Kakkar, Rohanpreet Singh : अॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी लंपास, नेहा कक्करच्या पतीचं समान हॉटेलमधून चोरीला!
Neha Kakkar, Rohanpreet Singh : नेहा कक्कर वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेत आले आहे. तिचा पती-पंजाबी गायक रोहनप्रीत (Rohanpreet Singh) एका चोरीचा शिकार ठरला आहे.
Neha Kakkar, Rohanpreet Singh : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलाशी लग्न केल्याने नेहा चर्चेत होती. यावेळी तिचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेत आले आहे. तिचा पती-पंजाबी गायक रोहनप्रीत (Rohanpreet Singh) एका चोरीचा शिकार ठरला आहे. वास्तविक ही संपूर्ण घटना हिमाचलमध्ये घडली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एका हॉटेलमधून नेहाचा पती रोहनप्रीत सिंहच्या सामानाची चोरी झाली आहे. या सामानामध्ये अनेक मौल्यवान गोष्टी होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, चोरी झालेल्या वस्तूंमध्ये अॅपल वॉच, आयफोन आणि डायमंड रिंगचा समावेश आहे.
या चोरीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीही चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक रोहनप्रीत शुक्रवारी रात्री हॉटेलमध्ये थांबला होता, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याचे डोळे उघडले, तेव्हा त्याला टेबलवर ठेवलेले त्याचे सामान दिसले नाही. त्याने इतरत्र शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र सामान जागेवर सापडले नाही. हरवलेल्या वस्तूंमध्ये त्याचे अॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी होती. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले असून, हॉटेलच्या खोलीबाहेर लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.
पोलिसांचा तपास सुरु
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलबाहेर सापडलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचीही या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे. सध्या मंडीच्या एसपी शालिनी अग्निहोत्री या प्रकरणाच्या तपासात गुंतल्या आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलवाल्यांकडेही चौकशी सुरू आहे. रोहनप्रीत आणि नेहा कक्कर यांच्या जोडीबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हे गायक जोडपे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
नुकताच रोहनप्रीत सिंहने नेहा कक्करसोबतचा एक व्हिडीओ शेअर केल्याने दोघेही चर्चेत आले होते. या व्हिडीओमध्ये दोघेही बेडरुममध्ये चहा घेताना दिसले. त्यांना पाहून तो कुठल्यातरी हॉटेलच्या खोलीत असल्याचेच वाटत होते.
हेही वाचा :