एक्स्प्लोर
Advertisement
वाद्यांचा आवाज तोंडाने काढून राष्ट्रगीत, ऋषभ गोखलेची कला
मुंबई : मुंबईतील ऋषभ गोखले या तरुणाने अनोखी कला जोपासली आहे. अॅकापेला असं या कलेचं नाव. वाद्यांचा आवाज तोंडाने काढून गाणं गाण्याची ही कला. ‘जन गण मन’ आणि ‘वन्दे मातरम्’ ही दोन गीतं ऋषभने आपल्या अनोख्या कलेतून गायली आहेत.
VIDEO : 'जन गण मन'
https://www.youtube.com/watch?feature=youtu.be&v=D1O_facR_5g&app=desktop
ट्रम्पेट, ट्रोम्बोन, बॅन्जो, ड्रम्स, व्होकल कॉयर, बेस गिटार यांचा आवाज तोंडाने काढून ‘द बेअर नेसेसिटीज’ गाणं सादर करणाऱ्या ऋषभच्या या कलेचं प्रचंड कौतुक होत आहे. या आधीही ऋषभने अशाचप्रकारे अनेक गाणी आपल्या अॅकापेला या कलेतून साकारली आहेत. या संकल्पनेतून ऋषभने भारताचं राष्ट्रगीतही सादर केलं आहे.
VIDEO : 'वन्दे मातरम्'
https://www.youtube.com/watch?feature=youtu.be&v=3m5igZqG5_Y&app=desktop
याआधी 1967 साली प्रदर्शित झालेल्या ‘द जंगल बुक’ या अॅनिमेटेड सिनेमातील ‘द बेअर नेसेसिटीज’ गाणं आपल्या अनोख्या कलेतून ऋषभने गायलं होतं.
सोलो अॅकापेलाचा प्रयोग देशात प्रथमच झाला असल्याचं ऋषभ सांगतो. याआधी दोघांनी मिळून किंवा ग्रुप अॅकापेलाचे प्रयोग देशात झाले आहेत.
ऋषभला सोलो अॅकापेलाची कल्पना कशी सूचली?
ऋषभला लहाणपणापासूनच बिटबॉक्सिंग किंवा वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज तोंडाने काढण्याची सवय होती. ड्रम्सचा आवाज सहजपणे तोंडाने काढत असे. उपजत आलेल्या या कलेला योग्य मार्ग देण्याचं ऋषभने ठरवलं आणि त्यातूनच ‘अॅकापेला’ ही संकल्पना सत्यात उतरली.
ऋषभचं ‘Rishabh Gokhale’ नावाचं स्वत:चं यूट्यूब चॅनेल आहे. यावर त्याने आतापर्यंत केलेले अॅकापेलाचे प्रयोग अपलोड केले आहेत. ऋषभची अनोखी कला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी नेटिझन्सही या चॅनेलवर गर्दी करताना दिसत आहेत.
ऋषभने आतापर्यंत भारताचं राष्ट्रगीत, वंदे मातरम्, जेम्स बाँड थीम म्युझिक, त्याचप्रमाणे हिंदुस्तानी क्लासिकल फ्युजन प्रकारातील ‘द फ्युज्ड राग’ या अल्बमध्ये राग भैरव आणि बागेश्रीमधील रचना साकारल्या आहेत.
https://www.youtube.com/user/soundlessound या लिंकवर ऋषभच्या सर्व रचना पाहता येतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
Advertisement