एक्स्प्लोर
नसीरुद्दीन शाह यांची अनुपम खेर यांच्यावर टीका, मोदी सरकारलाही सुनावलं!
नवी दिल्ली: मोदी सरकारवरुन आता बॉलिवूडच्या दोन दिग्गजांमध्येही वाद रंगण्याची चिन्हं आहेत. 'जी व्यक्ती कधीही काश्मीरात राहिली नाही, त्या व्यक्तीनं काश्मीरी पंडितांसाठी लढण्याचा चंग बांधला आहे.' अशी टीका अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी केली आहे.' असं म्हणत नसरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
'ए वेडनसडे' या सिनेमात एकत्र काम करणाऱ्या नसरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधला. नसरुद्दीन यांच्या या टीकेला अनुपम खेर यांनी ट्विटरवरुन उत्तर दिलं आहे.
अनुपम खेर यांचं ट्वीट: 'शाह साब की जय हो. तुमच्या तर्कानुसार एनआरआयनीं तर भारताबाबत विचारच केला नाही पाहिजे'
याशिवाय भाजपशासित राज्यांत अभ्यासक्रमात होणारा फेरफार यावरही नसरुद्दीन शाह यांनी खेद व्यक्त केला. 'पण सरकार एवढंही मूर्ख नाही की, ते देशाला अंधकारात लोटतील.' असंही ते म्हणाले. 'त्याचबरोबर लोक सरकारबाबत लवकरच मतं बनवतात. मात्र, लोकांनी अशी घाई करु नये, प्रत्येकाला वेळ द्यावा.' असंही शाह यांनी म्हटलं आहे.Shah Saab ki Jai Ho. By that logic NRI's should not think about India at all.:) Naseeruddin Shah on Anupam Kher https://t.co/UtQrtZ66we
— Anupam Kher (@AnupamPkher) May 27, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement