एक्स्प्लोर
Advertisement
नागराजच्या चाहत्याचा 'सैराट' प्रवास, बार्शी-पुणे अंतर पोस्टरसह सायकलवर पार
पुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमाने अक्षरश: याड लावलं आहे. चाहत्यांवर 'सैराट'ची झिंगची चढली आहे. नागराजच्या अशाच एका चाहत्याने 'सैराट'च्या प्रमोशनसाठी पोस्टरसह सायकलने प्रवास केला. या चाहत्याने बार्शी ते पुणे अंतर 'सैराट'च्या पोस्टरसह सायकलवर पार केलं आहे.
रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’
शौकत बार्शीकर असं या चाहत्याचं नाव आहे. बार्शी ते पुणे हे अंतर साधारणत: 200 ते 250 किमी आहे. या प्रवासात त्याने इंदापूर आणि उरळीकांचन या दोन ठिकाणी थांबे घेतले आणि तीन दिवसांनी पुण्यात दाखल झाला.VIDEO : भर थिएटरमध्ये ‘झिंगाट’वर सांगलीकर ‘सैराट’
शौकत स्वत:ला नागराजचा मित्र असल्याचं सांगतो. नागराज मंजुळेवरील प्रेमापोटी हे अंतर सायकलवर पार करत बार्शीवरुन पुण्यात आल्याचं सांगितलं. याआधी फँड्रीचंही असंच प्रमोशन केल्याचं शौकत बार्शीकरने सांगितलं.राज्यभरात 'सैराट'चं याड, पुण्यात हाऊसफुल्ल
दरम्यान, 'सैराट'ला राज्यभरात अपेक्षेप्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळत आहे. फँड्रीनंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित हा दुसरा सिनेमा आहे. कारकिर्दीच्या पहिल्याच सिनेमात रिंकू राजगुरुने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. उत्कृष्ट संगीत, दिग्दर्शन यामुळे हा सिनेमा अनेकांच्या पसंतीस येताना दिसत आहे.संबंधित बातम्या
रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’
VIDEO: मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
VIDEO: ख्रिस गेल आणि कोहलीचा ‘सैराट’ डान्स
VIDEO: उत्सुकता वाढवणारा ‘सैराट’चा ट्रेलर
EXCLUSIVE : हलगी वाजवत ‘सैराट’चं पोस्टर रिलीज
नववीत शिकणारी आर्ची, 13 किलो घटवलेला परशा, सारं काही ‘सैराट’!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement