एक्स्प्लोर
मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत
मी खूपच बोअरिंग असल्यामुळे माझ्या पहिल्या गर्लफ्रेण्डने मला सोडलं. तेव्हापासून मी 'इंटरेस्टिंग' गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी इतरांच्या नजरेत प्लेयर ठरत असेन, असं सुशांतला वाटतं.
मुंबई : 'बॉलिवूडमधला प्रॉमिसिंग चेहरा' अशी ख्याती असलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत त्याच्या बिनधास्तपणासाठी प्रसिद्ध आहे. मी बोअरिंग असल्यामुळे माझ्या पहिल्या गर्लफ्रेण्डने मला सोडलं, असं म्हणत सुशांतने बॉम्ब टाकला आहे. अर्थात अंकिता लोखंडेच्या नावाचा कुठेही उल्लेख त्याने केलेला नाही.
'मुंबई मिरर' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुशांतसिंग राजपूतने हा किस्सा सांगितला आहे. आपल्यावर बसलेला 'प्लेयर'चा शिक्का पुसण्याचा प्रयत्न असल्याचं तो म्हणाला. मी खूपच बोअरिंग असल्यामुळे माझ्या पहिल्या गर्लफ्रेण्डने मला सोडलं. तेव्हापासून मी 'इंटरेस्टिंग' गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी इतरांच्या नजरेत प्लेयर ठरत असेन, असं सुशांतला वाटतं.
पहिली गर्लफ्रेण्ड असं म्हणताना सुशांतने तिचं नाव घेणं टाळलं आहे. सुशांत सिंग राजपूत 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत काही वर्ष रिलेशनशीपमध्ये होता. त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना मोठा धक्का बसला. सुशांतची पहिली गर्लफ्रेण्ड अंकिताच होती, की दुसरी कोणी, हे यातून स्पष्ट होत नाही.
'राबता' चित्रपटाच्या शूटिंगवेळी अभिनेत्री क्रिती सॅनॉन आणि सुशांत कथित प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या.
दोघांनीही या अफवा वारंवार फेटाळून लावल्या आहेत. 'कितीही, काहीही चर्चा झाल्या, तरी आमच्यातलं मैत्रीचं नातं बदललेलं नाही. आम्हाला निश्चितच मानसिकदृष्ट्या त्याचा त्रास होतो. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्याचा पर्याय मी निवडला आहे.' असं सुशांत म्हणतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement