Munjya : वडिलांचा मृत्यू, घर विकलं, ट्रान्सजेंडर बनून रस्त्यावर राहिला; 100 कोटींचा चित्रपट देणाऱ्या अभिनेत्याची संघर्षगाथा
Abhay Verma Munjya : 100 कोटींचा चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला. वडिलांच्या आजारपणात घरही विकलं, त्याला ट्रान्सजेंडर बनून रस्त्यावर राहावं लागलं. याची संघर्षगाथा वाचा.
Abhay Verma Munjya : बॉलिवूडचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज्या चित्रपटाने (Munjya Movie) 100 कोटींच्या घरात एन्ट्री केली आहे. मुंज्या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. कमी बजेटमध्ये आणि कोणतेही दिग्गज कलाकार नसलेल्या या चित्रपटाने सर्वांच्या मनावर छाप पाडली आहे. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांकडून याला भरभरून दाद मिळताना पाहायला मिळत आहे. मुंज्या चित्रपटाने अनेक आठवडे बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. चित्रपटाच्या जबरदस्त यशाचे संपूर्ण श्रेय त्याची मजेदार संकल्पना, लोककथा आणि भयपट यामुळे चित्रपट सुपरहिट ठरला आहे. यातील मुख्य अभिनेता अभय वर्मा (Actor Abhay Verma) हा या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. पण अभय वर्माला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या.
वडिलांच्या आजारपणानंतर घर विकावं लागलं
अभिनेता अभय वर्माने अनेक चित्रपट आणि शोमध्ये काही छोट्या भूमिका केल्या आहेत. 'द फॅमिली मॅन' वेब सीरीजमधून अभय वर्माला ओळख मिळाली. 'मुंज्या' चित्रपटामुळे अभयचं नशीब पालटलं. 'मुंज्या'मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी अभयला मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. काही दिवसापूर्वी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता अभय वर्माने त्याच्या आतापर्यंतच्या संघर्षमय प्रवासाचा खुलासा केला.
अभयने सांगितले की, त्याचे वडील ज्वेलरीचे दुकान चालवायचे पण तो सहावीत असताना त्याच्या वडिलांना कावीळ झाली, ज्यामुळे त्याच्या यकृतावर परिणाम झाला आणि नंतर ते अंथरुणाला खिळले. वडिलांच्या आजारपणामुळे त्याची आई त्याच्या कुटुंबासाठी एकमेव कमावणारी होती. वाढत्या खर्चामुळे कुटुंबाने उदरनिर्वाहासाठी त्यांच्यावर घर विकण्याची वेळ आली. घर विकल्यानंतर वडिलांचं आजारपणात त्याची आई संसाराचा गाडा हाकत होती, मात्र तीन वर्षांनंतर अभयच्या वडिलांचं निधन झालं.
View this post on Instagram
रस्त्यांवर ट्रान्सजेंडर बनून राहावं लागलं
वयाच्या 19 व्या वर्षी अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन अभय मुंबईत आला. त्याचा मोठा भाऊ अभिषेकनेही टीव्ही शोमध्ये काम केलं होतं. काही वेळ संघर्ष केल्यानंतर अभयला इंडस्ट्रीमध्ये छोट्या भूमिका मिळू लागल्या. 2022 मध्ये त्याने सफेद चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या भूमिकेच्या तयारीसाठी अभय वाराणसीला गेला आणि तिथे अनेक आठवडे ट्रान्सजेंडर बनून रस्त्यावर राहिला. अभयने सांगितलं की, एकदा रात्री मुलांची टोळी त्याच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होती. त्यांच्या ताबडीतून सुटण्यासाठी त्याला त्याची खरी ओळख उघड करावी लागली होती. संदीप सिंग दिग्दर्शित, सफेद (Safed) चित्रपट गेल्या वर्षी ZEE5 वर प्रदर्शित झाला होता.
'मुंज्या'मुळे मिळालं स्टारडम
मनोज बाजपेयी स्टारर 'द फॅमिली मॅन' वेब सीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये कल्याणची सहाय्यक भूमिका साकारून अभय वर्माच्या करिअरला खरी सुरुवात झाली. तो पडद्यावर फक्त 3-4 सीन्ससाठी दिसला असला, तरीही त्याच्या अभिनयाचं जोरदार कौतुक झालं. आता मुंज्या चित्रपटामुळे अभय वर्माला स्टारडम मिळालं आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या चित्रपटात अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभिनेत्री मोना सिंग यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने जगभरात 123 कोटींची कमाई केली आहे आणि अजूनही चित्रपटगृहांमध्ये याची क्रेझ कायम आहे.
View this post on Instagram