एक्स्प्लोर
अॅडगुरु अॅलेक पदमसी यांचं निधन
हमारा बजाज, लिरील, सर्फ, चेरी ब्लॉसम शू पॉलिश यांसारख्या आकर्षक जाहिराती त्यांनी बनवल्या होत्या.अॅलेक पदमसी यांना 2000 सालात पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

मुंबई : आधुनिक भारतीय जाहिरात विश्वाचे जनक अॅलेक पदमसी यांचं आज (17 नोव्हेंबर) मुंबईत निधन झालं. 1982 मध्ये 'गांधी' सिनेमात मोहम्मद अली जिना यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अॅडगुरु अॅलेक पदमसी यांनी आज वयाच्या 90 व्या वर्षीअखेरचा श्वास घेतला.
देशातील टॉप अॅडव्हर्टायझिंग कंपनी 'लिंटास'ची स्थापना त्यांनी केली होती. हमारा बजाज, लिरील, सर्फ, चेरी ब्लॉसम शू पॉलिश यांसारख्या आकर्षक जाहिराती त्यांनी बनवल्या होत्या.
अॅलेक पदमसी यांना 2000 सालात पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी विल्यम शेक्सपिअरच्या 'मर्चंट ऑफ व्हेनिस' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. त्यांचे बंधू बॉबी पदमसी यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. यानंतर अॅलेक यांनीही अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलं होतं.
अॅलेक पदमसी यांच्या निधानावर जाहिरात, चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे.
“He was a man, take him for all in all, I shall not look upon his like again.” Hamlet, Act 1 scene 2. We will all miss you @alyquepadamsee RIP ALYQUE !! condolences @RaellsACE @shazahnpadamsee Q, Ranjit. pic.twitter.com/MAXf1GPb1y
— KUNAL VIJAYAKAR (@kunalvijayakar) November 17, 2018
Deepest condolences and prayers for the family and loved ones of #AlyquePadamsee sir...a true pioneer. May he rest in peace.
— Nimrat Kaur (@NimratOfficial) November 17, 2018
Saddened to hear of the passing of advertising doyen #AlyquePadamsee
When he was head of Lintas he’d given me some of my early breaks in advertising photography Ever grateful for the break and opportunity RIP Sir ???????????? pic.twitter.com/5aZ8EUVT69 — atul kasbekar (@atulkasbekar) November 17, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
