एक्स्प्लोर
'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'ची तिसऱ्या दिवशी विक्रमी कमाई
मुंबईः टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीची बॉक्स ऑफिसवर जोरदार बॅटिंग चालू आहे. 'धोनी दी अनटोल्ड स्टोरी' सिनेमाने केवळ भारतात तीन दिवसात तब्बल 66 कोटींची कमाई केली आहे. समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.
सिनेमाने शुक्रवारी 20.6 कोटींची कमाई केली, शनिवारी 20.60 कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशीही सिनेमाची घोडदौड कायम राहीली. या वीकेंडमध्ये हा सिनेमा 60 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त कमाई सिनेमाने केली.
https://twitter.com/taran_adarsh/status/782811174937124865
पहिल्याच दिवशी 20 कोटी कमाई करणारा हा या वर्षातील दुसरा सिनेमा आहे. या अगोदर 'सुलतान' या सिनेमाने 36 कोटींची कमाई केली आहे. धोनीने शाहरुख खानच्या 'फॅन'लाही मागे टाकलं आहे. 'फॅन'ने पहिल्या दिवशी 19 कोटींची कमाई केली होती. त्या पाठोपाठ धोनीच्या सिनेमाने 20 कोटींची कमाई करत नवा विक्रम नोंदवला आहे.
दिग्दर्शक नीरज पांडे यांचं दिग्दर्शन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. अनेक शहरात या सिनेमाचे शो हाऊसफुल सुरु आहेत. या सिनेमातून धोनीच्या आयुष्यातील अनेक किस्सेही समोर आले आहेत.
कसल्याही सुट्ट्या नसताना एवढी कमाई करण्याचा अनोखा विक्रम या सिनेमाच्या नावावर झाला आहे. सिनेमाला चेन्नईमध्ये जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. हा सिनेमा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. त्याचा देखील फायदा झाल्याचं दिसत आहे. देशभरात जवळपास 3 हजार स्क्रिनवर हा सिनेमा रिलीज झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement