![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sargam Koushal: शिक्षिका म्हणून केलं काम, पती भारतीय नौदलातील अधिकारी; मिसेस वर्ल्डचा खिताब पटकवणारी सरगम कौशल कोण?
मिसेस वर्ल्ड 2022-23 (Mrs. World 2022-23 Pageant) या स्पर्धेचं विजेते पद भारताच्या सरगम कौशलने पटकावलं आहे.
![Sargam Koushal: शिक्षिका म्हणून केलं काम, पती भारतीय नौदलातील अधिकारी; मिसेस वर्ल्डचा खिताब पटकवणारी सरगम कौशल कोण? mrs world 2022 sargam kaushal won indian got trophy after 21 years know about her Sargam Koushal: शिक्षिका म्हणून केलं काम, पती भारतीय नौदलातील अधिकारी; मिसेस वर्ल्डचा खिताब पटकवणारी सरगम कौशल कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/19/51086556acf60cc5f48ac6f729f3b8421671426545216259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sargam Koushal: भारताच्या सरगम कौशलने (Sargam Koushal) अमेरिकेत आयोजित केलेल्या मिसेस वर्ल्ड 2022-23 (Mrs. World 2022-23 Pageant) या स्पर्धेचे विजेते पद पटकावलं आहे. लास वेगसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मिसेस वर्ल्ड 2022’ या स्पर्धेत 63 देशांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सरगमने 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. सध्या देशभरातील लोक सरगमला शुभेच्छा देत आहेत. सरगम कौशल हिच्याबद्दल जाणून घेऊयात...
सरगम ही जम्मू-काश्मिरची असून सध्या ती मुंबईमध्ये राहते. तिनं इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिने विशाखापट्टणम येथील शाळेत शिक्षिका म्हणूनही काम केले आहे. पुढे शिक्षकी पेशा सोडून सरगमनं मॉडेलिंग क्षेत्रात एन्ट्री केली. मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 हा किताब देखील सरगमनं जिंकला. भारतीय नौदलातील अधिकारी आदित्य मनोहर शर्मा यांच्याशी 2018 मध्ये सरगमनं लग्न केलं.
सगरम ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. सगरमला तीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
सरगम कौशलच्या आधी 2001 मध्ये अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने (Aditi Govitrikar) हा किताब जिंकला होता. अदिती गोवित्रीकरनं भेजा फ्राय, दे दना दन, स्माइल प्लीज या चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय, मोहम्मद अझरुद्दीन, कॉउचर डिझायनर मौसमी मेवावाला आणि माजी मिसेस वर्ल्ड अदिती गोवित्रीकर यांनी ‘मिसेस वर्ल्ड 2022’ या स्पर्धेला हजेरी लावली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)