Mrs Chatterjee Vs Norway Trailer: 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चा ट्रेलर रिलीज; मुलांसाठी लढा देणाऱ्या महिलेची गोष्ट, राणीच्या अभिनयाचं होतंय कौतुक
'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' (Mrs Chatterjee Vs Norway) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात राणी मखर्जीनं (Rani Mukerji) प्रमुख भूमिका साकारली आहे.
Mrs Chatterjee Vs Norway Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) ही गेली अनेक वर्ष अभिनयक्षेत्रात काम करत आहे. वेगवेगळ्या विषयांवरील आधारित चित्रपटांमध्ये राणीनं काम केलं. सध्या राणी तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे. राणीच्या 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' (Mrs Chatterjee Vs Norway) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलर रिलीज होताच, अनेकांनी या चित्रपटाच्या ट्रेलरमधील राणीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, देविका चॅटर्जी ही तिच्या दोन मुलांसाठी लढा देत आहे.
'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राणी ही देविका चॅटर्जी या भूमिकेत दिसत आहे. देविका ही तिची दोन मुलं आणि पतीसोबत नॉर्वेमध्ये राहात असते. ट्रेलरमध्ये दिसते की देविकाच्या दोन मुलांना काही लोक घेऊन जातात. त्यानंतर आपल्या मुलांना परत मिळण्यासाठी देविका ही कोर्टात लढा देताना दिसते. देविकाला तिची मुलं परत मिळतात का? देविकाला नॉर्वेमध्ये कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' हा चित्रपट पाहिल्यानंतर मिळणार आहेत. हा चित्रपट 17 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे.
पाहा ट्रेलर:
View this post on Instagram
अभिनेत्री अलिया भट्ट आणि करण जोहर यांनी 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. करण जोहरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन लिहिलं की, 'राणीचा हा आजपर्यंतचा सर्वात चांगला परफॉर्मन्स आहे. ये सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है'
View this post on Instagram
आशिमा चिब्बर यांनी 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राणी मुखर्जीचा हा चित्रपट आधी 3 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता हा चित्रपट 17 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राणीच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
जन्माच्या वेळी दुसऱ्या बाळासोबत झाली होती राणीची अदला बदल! तुम्हाला माहितीये का ‘हा’ किस्सा?