Movie Tickets Rate : राष्ट्रीय सिनेमा दिनानंतरही स्वस्तात पाहता येणार चित्रपट; ‘या’ तारखेपर्यंत सुरु राहणार ऑफर! जाणून घ्या...
Movie Tickets Rate : नुकताच देशभरात ‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’ (National Cinema Day) साजरा करण्यात आला. या दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये कमालीची गर्दी पाहायला मिळाली.
Movie Tickets Rate : नुकताच देशभरात ‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’ (National Cinema Day) साजरा करण्यात आला. या दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये कमालीची गर्दी पाहायला मिळाली. अवघ्या 75 रुपयांत चित्रपट पाहायला मिळाल्याने चित्रपटगृह हाऊसफुल झाली होती. या उपक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता आता काही मल्टीप्लेक्सनी ही ऑफर आणखी काही काळासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 75 रुपयांच्या तिकिटाचा प्रेक्षकांवर चांगला प्रभाव पाहायला मिळाला होता. याच गोष्टीचा विचार करत आता काही मल्टीप्लेक्समध्ये येत्या 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत तिकिटांचे दर कमी ठेवण्याची ही स्कीम सुरु राहणार आहे.
गेली दोन वर्ष कोरोनामुळे सगळीकडेच लॉकडाऊन लागला होता. या काळात सगळेच उद्योग ठप्प झाले होते. मनोरंजन विश्वाला देखील याचा मोठा फटका बसला होता. या काळात चित्रीकरणासह प्रदर्शन देखील स्थगित करण्यात आले होते. मात्र, आता कोरोना परिस्थिती काही अंशी निवळल्यानंतर पुन्हा एकदा सगळे उद्योग पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यातच मनोरंजन विश्वातील कामकाज देखील आता सुरळीत होत आहे. याच पार्श्वभूमीवर झालेली गर्दी चित्रपटाशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आनंददायी होती.
आणखी काही कला सुरु राहणार ही ऑफर!
कोरोना काळानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहे हाऊसफुल झाली होती. अशा परिस्थितीत देशातील मोठमोठे मल्टीप्लेक्स 75 रुपयांची चित्रपट तिकीट योजना आता आणखी काही दिवस सुरू ठेवण्याचा विचार करत आहेत. बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार, नवीन मल्टीप्लेक्स चेन MovieMax ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर जाहीर केले आहे की, त्यांच्या मल्टीप्लेक्समधील चित्रपट तिकीटांची किंमत आता 70 रुपयांपासून सुरू होणार आहे. काही चित्रपटगृहांमध्ये तिकिटाचे दर केवळ 100 रुपये ठेवण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, INOX Leisure Limited चे AVP, पुनीत गुप्ता यांनी याबाबत बोलताना सांगितले के, येत्या गुरुवारपर्यंत, चित्रपटाची तिकिटे सर्व मल्टीप्लेक्समध्ये केवळ 112 रुपयांपासून उपलब्ध असतील.
पाहा पोस्ट :
23 सप्टेंबर रोजी देशभरात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ साजरा करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट दिनाचे निमित्त साधत देशभरात अवघ्या 75 रुपयांमध्ये प्रेक्षकांना चित्रपटांचा आस्वाद घेता आला. तिकीटाचे दर कमी असल्याने चित्रपटगृहांमध्ये चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. तब्बल 65 लाखांहून अधिक लोकांनी या दिवशी मनोरंजनाचा आस्वाद घेतला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर ही गर्दी आणि असा जल्लोष पाह्यला मिळाला.
संबंधित बातम्या