National Cinema Day : सिनेप्रेमींसाठी खुशखबर! 'राष्ट्रीय चित्रपटदिनी' सिनेमे पाहा फक्त 75 रुपयांत
National Cinema Day : 'राष्ट्रीय चित्रपटदिनी' देशभरात विविध ठिकाणी 4000 स्क्रीन्सवर 75 रुपयांत सिनेमा दाखवण्यात येणार आहे.
National Cinema Day : सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 16 सप्टेंबर हा दिवस देशभरात 'राष्ट्रीय चित्रपट दिवस' (National Cinema Day) म्हणून साजरा केला होता. यंदा यादिवशी देशभरात विविध ठिकाणी 4000 स्क्रीन्सवर 75 रुपयांत सिनेमा दाखवण्यात येणार आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) यासंदर्भात घोषणा केली आहे.
पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, सिटीप्राइड अशा अनेक ठिकाणी तिकीटांची किंमत 200-300 रुपये आहे. पण आता 'राष्ट्रीय सिनेमा दिनी' 4000 स्क्रीन्सवर प्रेक्षकांना 75 रुपयांत सिनेमा पाहता येणार आहे. एमएआयने दिलेल्या माहितीनुसार,"सर्व वयोगटातील मंडळींना एकत्र एकादिवशी सिनेमा पाहता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे".
75 रुपयांत 'हे' सिनेमे पाहायला मिळणार
सिनेप्रेमींना 'राष्ट्रीय चित्रपटदिनी' खास 75 रुपयांत सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात 'केजीएफ चॅप्टर 2', 'आरआरआर', 'विक्रम' या दाक्षिणात्य सिनेमांचा, 'भूल भुलैया 2' या बॉलिवूड सिनेमाचा आणि डॉक्टर स्ट्रेंज आणि टॉप गन : मेवरिक' या हॉलिवूड सिनेमांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत या सिनेमांनी सिनेमागृहात धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे.
National Cinema Day will be held at more than 4000 participating screens and will include cinema screens of PVR, INOX, CINEPOLIS, CARNIVAL, MIRAJ, CITYPRIDE, ASIAN, MUKTA A2, MOVIE TIME, WAVE, M2K, DELITE and many others. pic.twitter.com/nVpM5neXd1
— Multiplex Association Of India (@MAofIndia) September 2, 2022
एमएआयचे अध्यक्ष कमल ज्ञानचंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, सिटीप्राइड अशा सर्व सिनेमागृहांमध्ये 16 सप्टेंबरला 75 रुपयांत सिनेमे पाहायला मिळणार आहेत. तर 16 सप्टेंबर या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे सिनेमेदेखील प्रेक्षकांना 75 रुपयांतच पाहायला मिळणार आहेत. कोरोनामुळे अनेकांनी सिनेमागृहांकडे पाठ फिरवली होती. पण आता 16 सप्टेंबरला पुन्हा एकदा अनेक सिनेमागृहांत हाऊसफुल्लचा बोर्ड झळकू शकतो. या उपक्रमाला प्रेक्षक नक्कीच चांगला प्रतिसाद देतील".
संबंधित बातम्या