एक्स्प्लोर
गूगल सर्चमध्ये काल दिवसभरात ‘श्रीदेवी’ टॉप
श्रीदेवी या मूळच्या दक्षिण भारतातल्या असल्याने, त्यांच्या नावाने फेसबुकवर सर्च करण्यात दक्षिण भारतातील यूझर्सची संख्या मोठी आहे.
नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आकस्मात निधनामुळे सिनेसृष्टीसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली. शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास श्रीदेवी यांनी दुबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर श्रीदेवी यांच्याबद्दल अधिक महिती जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्याच चाहत्यांना लागली आणि अर्थात ‘गूगल’ची मदत घेतली गेली.
रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत गूगलवर ‘Sridevi/श्रीदेवी’ ही नावं 10 लाखांपर्यंत सर्च केले गेले. दुपारी 4 वाजता 'श्रीदेवी' नावाच्या सर्चचा आकडा 50 लाखांवर गेला, त्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर एक कोटींचा टप्पा पार केला.
श्रीदेवी या मूळच्या दक्षिण भारतातल्या असल्याने, त्यांच्या नावाने फेसबुकवर सर्च करण्यात दक्षिण भारतातील यूझर्सची संख्या मोठी होती. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओदिशा या राज्यांमधील यूझर्सनी सर्वाधिक वेळा ‘श्रीदेवी’ यांचं नाव गूगलवर सर्च केले. उत्तर भारतातील हिंदी भाषिक पट्ट्यातील यूझर्सनी श्रीदेवी यांचं नाव फारसं गूगलवर सर्च केले नाही, अशी आकडेवारी सांगते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement