एक्स्प्लोर
धोनीचा सिनेमा मराठीत डब करायला मनसेचा विरोध
मुंबई: मनसेच्या नव्या भूमिकेमुळे एका नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सुशातसिंह राजपूत प्रमुख भूमिकेत असलेल्या एम.एस.धोनी हा सिनेमा मराठीत डब करायला मनसेने विरोध केला आहे.
हा सिनेमा मराठीत डब केल्यास तो थिएटरमध्ये रिलीज होऊ देणार नाही असा पवित्रा मनसे चित्रपट सेनेनं घेतला आहे. हिंदी सिनेमा मराठीत डब करुन मराठी सिनेमाला स्पर्धा नको अशी भूमिका मनेसेने घेतल्याचं समजतं आहे. हवं असल्याचं निर्मात्यांनी पूर्ण सिनेमा मराठीत बनवावा. पण हिंदी सिनेमा मराठीत डब करुन प्रदर्शित करायला आमचा विरोध असेलं, असंही मनसेने स्पष्ट केलं
याप्रकरणी बोलताना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, 'या सिनेमाला मनसेचा विरोध नाही पण हा हिंदी सिनेमा मराठीत डब करण्यास आमचा विरोध आहे. असेच जर सगळे हिंदी सिनेमे मराठीत प्रदर्शित व्हायला लागले तर अशानं मराठी सिनेमा संपून जातील. एका मराठी चित्रपटामुळे 400 ते 500 जणांचं पोट भरतं. त्यामुळे आम्ही या सिनेमाशी संबंधितांना पहिले निवदेन देऊ, हात जोडू. नाही समजलं तर मग लोकशाही मार्गानं आंदोलन करु.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement