एक्स्प्लोर
मिलिंद सोमण-अंकिता कोवरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला?
अंकिताच्या भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिलिंद गेल्या महिन्यात गुवाहाटीला गेला होता. त्यावेळी अंकिताच्या आई-वडिलांसह तिचे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांची मिलिंदने भेट घेतली.
मुंबई : विविध वयोगटातील तरुणींचं हार्टब्रेक करणारी बातमी बॉलिवूडमधून आली आहे. अभिनेता, सुपरमॉडेल मिलिंद सोमण पुढच्या वर्षी गर्लफ्रेण्ड अंकिता कोवरसोबत विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. मिलिंद आणि अंकिता यांच्या वयातील मोठ्या अंतरामुळे ही जोडी चर्चेचा विषय ठरत आहे.
90 च्या दशकात अलिशा चिनायच्या 'मेड इन इंडिया' म्युझिक व्हिडिओतून मिलिंद सोमण घराघरातील तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला. वयोमानाने मिलिंद सोमणपुढे हात टेकल्याचं त्याचे चाहते म्हणतात. दोघांच्या वयातील अंतर प्रेमाच्या आड येत नाही, यावर खुद्द मिलिंदचाही विश्वास आहे.
52 वर्षांचा मिलिंद आणि 26 वर्षांची अंकिता 2018 मध्ये लग्न करणार आहेत. 4 नोव्हेंबर 1965 रोजी जन्मलेल्या या आयर्नमॅनचा फिटनेस तरुणांना लाजवेल असाच आहे. त्याच्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे.
अंकिताच्या भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिलिंद गेल्या महिन्यात गुवाहाटीला गेला होता. त्यावेळी अंकिताच्या आई-वडिलांसह तिचे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांची मिलिंदने भेट घेतली. दोघांच्या वयातील अंतर हा अंकिताच्या पालकांसाठी चिंतेचा विषय होता, मात्र मिलिंदच्या भेटीनंतर त्यांची काळजी मिटल्याचं म्हटलं जातं.
दुसरीकडे मिलिंदच्या 78 वर्षीय मातोश्रींनीही दोघांच्या नात्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच मिलिंद सोमणच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत.
मिलिंद सोमणचं हे दुसरं लग्न आहे. 2006 मध्ये त्याने फ्रेंच मॉडेल मायलिन जामपानोईसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र तीन वर्षांच्या आतच दोघं विभक्त झाले.
बॉलिवूडमधील त्याचं करिअर फार खास नाही. त्याने 16 डिसेंबर, रुल्स: प्यार का सुपरहिट फॉर्मूला, भ्रम, से सलाम इंडिया, भेजा फ्राय आणि बाजीवर-मस्तानी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर सैफ अली खानच्या शेफ चित्रपटात तो अखेरचा दिसला होता.
फिटनेसमधून वेळ काढून त्याने काही चित्रपट आणि टीव्ही शो केले आहेत. मराठी, तेलुगू, तामीळ, इंग्लिश, जपानी, जर्मन, फ्रेंच, स्वीडिश यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.
मधु सप्रेसोबतच्या जाहिरातीमुळे वाद
1995 मध्ये एका शूज ब्रॅण्डच्या जाहिरातीमध्ये तो आणि मधु सप्रे झळकले होते. या ब्लॅक अँड व्हाईट जाहिरातीत मिलिंद आणि मधुने आपल्या शरीरावर केवळ पायथन लपेटला होता आणि पायात शूज घातले होते, त्या शूजची ती जाहिरात होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement