(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Met Gala 2023: मेट गाला 2023 मध्ये मांजरीचा लूक करुन का गेले होते सेलिब्रिटी? 'हे' आहे कारण
मेट गाला 2023 (Met Gala 2023) या इव्हेंटसाठी अनेक सेलिब्रिटींनी कॅटसारखा म्हणजेच मांजरीसारखा लूक केला होता.
Met Gala 2023: मेट गाला 2023 (Met Gala 2023) हा इव्हेंट पार पडला आहे. मेट गाला 2023 या इव्हेंटला विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये काही सेलिब्रिटींनी हटके लूक केला होता. तर काही सेलिब्रिटींच्या लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. मेट गाला 2023 या इव्हेंटसाठी अनेक सेलिब्रिटींनी कॅट म्हणजेच मांजरीचा लूक केला होता. सेलिब्रिटींनी मांजरीसारखा लूक का केला होता? याबाबत जाणून घेऊयात..
मेट गाला 2023 ची थीम कार्ल लेजरफेल्ड यांच्यावर आधारित होती. दिवंगत फॅशन डिझायनर कार्ल लेजरफेल्ड हे जगभरात खूप लोकप्रिय होते. त्यांच्या उत्कृष्ट डिझाइन्सचं लोकांनी कौतुक केलं होत. कार्ल लेजरफेल्ड मांजरी देखील लोकप्रिय आहे. त्या मांजरीचं नाव चौपेट असं आहे. चौपेट ही मांजरी तिच्या जीवनशैलीसाठी खूप प्रसिद्ध आहे. चौपेट ही जगभरातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. चौपेटकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट, डिझायनर कपडे आहेत. लेगरफेल्ड हे एकदा म्हणाले होते की, चौपेटने जगाचं लक्ष केंद्रीत केलं आहे.
View this post on Instagram
चौपेटचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत. चौपेटचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट देखील आहे. या अकाऊंटला 190k फॉलोअर्स आहेत. कार्ल लेजरफेल्ड यांना त्यांची चौपेट ही मांजर खूप आवडत होती. 2019 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी कार्ल लेजरफेल्ड यांचा मृत्यू झाला.
मेट गाला 2023 ची थीम कार्ल लेजरफेल्ड यांना समर्पित करण्यात आली. त्यामुळे या इव्हेंटला अनेक सेलेब्स चौपेटच्या लूकमध्ये पोहोचले. जेरेड लेटो, लिल नास एक्स आणि डोजा कॅट सारख्या सेलिब्रिटींनी मांजरी सारखा लूक केला होता.
View this post on Instagram
जेना ऑर्टेगा, किम कार्दशियन, रोझे या सेलिब्रिटींनी देखील मेट गाला इव्हेंटमध्ये हजेरी लावली. तसेच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा यांनी देखील मेट गाला या इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. मेट गाला इव्हेंटमधील सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Met Gala 2023: हॉलिवूड सेलिब्रिटींची 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर हवा; आऊफिटनं वेधलं लक्ष