एक्स्प्लोर

Telly Masala : 'एक दोन ती चार'चा धमाकेदार टीझर रिलीज ते छोटा पडदा गाजवणाऱ्या 'TOP 10' मराठी मालिका; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Nana Patekar : "पुढच्या वेळी उत्तर प्रदेशला आलात तर..."; माजी IAS अधिकाऱ्याने व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकरांना दिली धमकी

Formar IAS Abhishek Singh Nana Patekar Slap Case : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये ते एका व्यक्तीच्या कानाखाली वाजवताना दिसत होते. नानांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. एकीकडे हा सिनेमाचा भाग असल्याचं म्हटलं गेलं तर दुसरीकडे सेल्फी घेण्यासाठी नानांजवळ गेलो असता त्यांनी कानाखाली वाजवल्याचा खुलासा चाहत्याने केला. आता याप्रकरणी माजी आएएस अधिकारी अभिषेक सिंहने (IAS Abhishek Singh) व्हिडीओ शेअर करत नानांना धमकी दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ek Don Teen Char : निपुण धर्माधिकारी अन् वैदेही परशुरामीची हटके लव्हस्टोरी; 'एक दोन तीन चार'चा धमाकेदार टीझर रिलीज

Ek Don Teen Char : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खूपच कमाल होतं. कोरोनानंतर प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्याचं काम मराठी मनोरंजनसृष्टीने केलं आहे. अनेक मराठी सिनेमांनी (Marathi Movies) बॉक्स ऑफिस गाजवलं. आता पुढच्या वर्षाची सुरुवातदेखील मनोरंजनात्मक होणार आहे. नुकताच 'एक दोन तीन चार' (Ek Don Teen Char) या मराठी सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. हा टीझर सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Top 10 Marathi Serials : 'आभाळमाया', 'वादळवाट' ते 'जुळून येती रेशीमगाठी'; 'या' 10 मालिकांनी गाजवला छोटा पडदा

Marathi Serials : 'आभाळमाया', 'वादळवाट' ते 'जुळून येती रेशीमगाठी' अशा अनेक मालिकांनी छोटा पडदा चांगलाच गाजवला आहे. 'दामिनी' ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली होती. या मालिकेत प्रतीक्षा लोणकर मुख्य भूमिकेत होती. अन्नायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका स्त्रीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती. या मालिकेचं टायटल ट्रॅकदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Bhalchandra Kadam : 'एकदा येऊन तर बघा' चित्रपटात भाऊ कदम साकारणार 'ही' भूमिका; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Ekda Yeun Tar Bagha: आपल्या  विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना मनमुराद  हसवणाऱ्या अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच त्यांचा  'एकदा येऊन तर बघा' ( Ekda Yeun Tar Bagha)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये भाऊ कदम हे खास भूमिकेत दिसणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Maharashtrachi Hasyajatra : संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी "कोहली फॅमिली"; प्रसादनं सांगितला अवली, पावली, शिवाली आणि बिवाली या कॅरेक्टर्सचा किस्सा

Maharashtrachi Hasyajatra: छोट्या पडद्यावरील  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)   या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या कार्यक्रमामधील शिवाली आवली कोहली, बिवाली आवली कोहली, पावली आवली कोहली,आवली लवली कोहली या कोहली फॅमिलीनं  संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. कोहली फॅमिलीच्या स्किटला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या फॅमिलीच्या स्टिकची आयडीया कोणाला आली? या स्किटमधील कॅरेक्टर्सचा लूक या सर्व गोष्टींबाबत अभिनेता प्रसाद खांडेकरनं (Prasad Khandekar) सांगितलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटीलABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget