Nana Patekar : "पुढच्या वेळी उत्तर प्रदेशला आलात तर..."; माजी IAS अधिकाऱ्याने व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकरांना दिली धमकी
Nana Patekar Slap Case : नाना पाटेकरांना माजी IAS अधिकारी अभिषेक सिंहने (Abhishek Singh) व्हिडीओ शेअर करत धमकी दिली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Formar IAS Abhishek Singh Nana Patekar Slap Case : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये ते एका व्यक्तीच्या कानाखाली वाजवताना दिसत होते. नानांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. एकीकडे हा सिनेमाचा भाग असल्याचं म्हटलं गेलं तर दुसरीकडे सेल्फी घेण्यासाठी नानांजवळ गेलो असता त्यांनी कानाखाली वाजवल्याचा खुलासा चाहत्याने केला. आता याप्रकरणी माजी आएएस अधिकारी अभिषेक सिंहने (IAS Abhishek Singh) व्हिडीओ शेअर करत नानांना धमकी दिली आहे.
नाना पाटेकरांच्या कानाखाली वाजवण्याच्या प्रकरणावर माजी आयएएस अधिकारी अभिषेकने आवाज उठवला आहे. अभिषेक म्हणाला,"पीडित तरुणाने आमच्यासोबत संपर्क साधल्यास कारवाई करू. या पीडित तरुणाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला हवी". अभिषेक सिंहच्या आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर आधी चाहत्याच्या कानाखाली वाजवताना दिसत आहेत. नंतर अभिषेक याप्रकरणी आपलं मत मांडताना दिसत आहे.
View this post on Instagram
अभिषेक सिंहने नाना पाटेकरांना दिली धमकी
अभिषेक सिंह नाना पाटेकरांना धमकी देत म्हणाला,"उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लोकांना उत्तर कसं द्यायचं हे चांगलच माहिती आहे. आम्ही परिपूर्ण आहोत. आम्ही उत्तम स्वागत करतो, आम्ही चांगल्याप्रकारे लोकांचा आदर करतो, त्याप्रमाणे आम्ही मारहाणदेखील उत्तमच करतो. त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही उत्तरप्रदेशात याल तेव्हा तुमच्यासोबत चांगला व्हवहार होणार नाही याची आम्ही विशेष काळजी घेऊ".
नेमकं प्रकरण काय?
नाना पाटेकर बनारसमध्ये त्यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत होतं. त्यावेळी एक चाहता सेल्फी घेण्यासाठी त्यांच्याजवळ गेला. दरम्यान नाना पाटेकरांनी त्या चाहत्याच्या कानाखाली वाजवली. नानांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर नानांनी एक व्हिडीओ शेअर करत (Nana Patekar On Viral Video) आपली बाजू मांडली.
नाना म्हणाले,"मी चाहत्याच्या कानाखाली वाजवली नसून हे सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचं एक दृश्य आहे". त्यानंतर माध्यमांशी बोलताना नानांनी कानाखाली वाजवलेला चाहता म्हणाला,"मी नानांचा मोठा चाहता असून त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो होतो. पण सेल्फी न देता त्यांनी माझ्या कानाखाली वाजवली".
संबंधित बातम्या