Bhalchandra Kadam: 'एकदा येऊन तर बघा' चित्रपटात भाऊ कदम साकारणार 'ही' भूमिका; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Ekda Yeun Tar Bagha: भाऊ कदम यांचा 'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये भाऊ कदम हे खास भूमिकेत दिसणार आहेत.
Ekda Yeun Tar Bagha: आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच त्यांचा 'एकदा येऊन तर बघा' ( Ekda Yeun Tar Bagha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये भाऊ कदम हे खास भूमिकेत दिसणार आहेत.
भाऊ कदम यांचा लूक
8 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'एकदा येऊन तर बघा' या आगामी चित्रपटात भाऊ कदम एका खास भूमिकेत दिसणार आहेत. ‘बाबा गुलाबी गरम’ ही व्यक्तिरेखा ते यात साकारणार आहेत. अडचणीत असलेल्या भक्तांना मार्गदर्शन देणारे ‘बाबा गुलाबी गरम’ यांची लीला चित्रपटात पहाण्याची गंमत वेगळी आहे. गळ्यात फुलांची माळ आणि डोक्यावर टोपी असा ‘बाबा गुलाबी गरम’ यांचा लूक आहे.
View this post on Instagram
'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची स्टार कास्ट
लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. आपल्या भूमिकेविषयी भाऊ सांगतात, ‘खूप मजेशीर अशी ही व्यक्तिरेखा आहे. हा ‘बाबा गुलाबी गरम’ प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल असा विश्वास ते व्यक्त करतात. भाऊ कदम यांच्या सोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार असे ए सो एक विनोदवीर या चित्रपटात आहेत.
'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे. कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. मनोज अवना आणि कृपाल सिंग कार्यकारी निर्माते आहेत. लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत.