Telly Masala : 'सुभेदार'ला प्रेक्षकांची पसंती ते सासूबाईंना जोडवी घालताना मिताली झाली भावूक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
![Telly Masala : 'सुभेदार'ला प्रेक्षकांची पसंती ते सासूबाईंना जोडवी घालताना मिताली झाली भावूक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... marathi movie telly masala marathi serial latest update marathi movies Digpal Lanjekar Subhedar box office collection Kedar Shinde Suresh Wadkar Mitali Mayekar Telly Masala : 'सुभेदार'ला प्रेक्षकांची पसंती ते सासूबाईंना जोडवी घालताना मिताली झाली भावूक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/56d51a5df25cb77a017519423099655b1693046689429254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Subhedar : 'सुभेदार' चित्रपट झाला रिलीज; चाहत्यांचा थिएटरबाहेर जल्लोष, पोस्टरला केला दुधाचा अभिषेक, व्हिडीओ व्हायरल
Subhedar : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या 'सुभेदार' (Subhedar) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटामधील गाणी आणि चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता सुभेदार चित्रपट हा काल (25 ऑगस्ट) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सुभेदार चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी थिएटरबाहेर जल्लोष केला. तसेच अनेकांनी थिएटरबाहेरील चित्रपटाच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक केला.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kedar Shinde : रंगभूमीवर प्रेम अन् सिनेमाला श्वास मानणाऱ्या, तर बाईपण खरंच भारी हे कळलेल्या केदार शिंदेंचा 'माझा सन्मान' पुरस्कारानं गौरव
Kedar Shinde : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शिक केदार शिंदे (Kedar Shinde) सध्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासोबत हा सिनेमा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तीनही माध्यमांमध्ये केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी आपल्या जबरदस्त दिग्दर्शकीय आणि लेखन कौशल्याने उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना 'माझा सन्मान' (Majha Sanman 2023) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Suresh Wadkar : सुरांनी प्रेक्षकांचे आयुष्य सुरेल करणाऱ्या गायक सुरेश वाडकर यांना 'माझा सन्मान' पुरस्कार प्रदान!
Suresh Wadkar: गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) हे आपल्या तलम आणि तरल आवाजाने गेली पाच दशकं संगीतविश्वावर आपला ठसा उमटवणारे स्वराधिश आहेत. त्यांना 'माझा सन्मान' (Majha Sanman 2023) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Subhedar : 'सुभेदार'साठी नागराज मंजुळेंनी घेतला महत्त्वाचा निर्णय; सिनेमाने पहिल्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई
Subhedar Movie Box Office Colletion : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'सुभेदार' (Subhedar) हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेप्रेमी गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर 25 ऑगस्ट 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'सुभेदार' सिनेमामुळे नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) त्यांच्या 'बापल्योक' (Baaplyok) सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mitali Mayekar : सासूबाईंना जोडवी घालताना मिताली झाली भावूक; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Mitali Mayekar: अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या (Siddharth Chandekar) आईनं काही दिवसांपूर्वी दुसरं लग्न केलं. सिद्धार्थनं याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांनी सोशल मीडियावर सीमा चांदेकर यांच्या लग्नसोहळ्याचे काही फोटो शेअर केले. त्यांनी शेअर केलेल्या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)