एक्स्प्लोर

Suresh Wadkar: सुरांनी प्रेक्षकांचे आयुष्य सुरेल करणाऱ्या गायक सुरेश वाडकर यांना 'माझा सन्मान' पुरस्कार प्रदान!

गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना 'माझा सन्मान' (Majha Sanman 2023) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

Suresh Wadkar:  गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) हे आपल्या तलम आणि तरल आवाजाने गेली पाच दशकं संगीतविश्वावर आपला ठसा उमटवणारे स्वराधिश आहेत. त्यांना 'माझा सन्मान' (Majha Sanman 2023) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

आपल्या मुलाने गायक व्हावं अशी सुरेशजींच्या वडिलांची इच्छा. ती इच्छा सुरेशजींनी अशी पूर्ण केली की ,त्यानंतर प्रत्येक पिता आपल्या मुलानं सुरेशींसारखं गायक बनावं अशी इच्छा मनी बाळगू लागला. गुरु जियालाल वसंत यांनी केलेले संस्कार आणि गोड आवाजाचं वरदान मिळालेल्या सुरेशजींच्या गाण्यांनी इतिहास रचला नसता तरच नवल.

दिवसाची सुरुवात ज्या सुरांनी व्हावी ते ओमकार स्वरुपा असो  किंवा मग मेरी किस्मत मे तू नही शायद ही प्रियकराची आर्त वेदना,  सुरेशजींच्या गाण्यांनी प्रत्येक क्षणाची सोबत केली. सुरांनी आपल्या साऱ्यांचं आयुष्य सुरेल करणाऱ्या, आपल्या गाण्यानं साऱ्यांनाच तृप्त तृप्त करणाऱ्या स्वराधिशाला, आपल्या लाडक्या सुरेश वाडकर यांना एबीपी माझा कृतज्ञतापूर्वक माझा सन्मान पुरस्कार प्रदान करत आहे.

सुरेश वाडकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. वयाच्या 10 व्या वर्षापासून त्यांनी त्यांचे गुरु पंडित जियालाल वसंत यांच्याकडून संगीताचे औपचारिक धडे घ्यायला सुरुवात केली.

 सुरेश वाडकर यांच्यासोबतच केदार शिंदे, अभिनेत्री श्रद्धा कपूर,संगीतकार अशोक पत्की यांना देखील एबीबी माझाच्या 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सुरेश वाडकर यांची गाणी

'छोड़ आए हम'  'चप्पा चप्पा चरखा चले', 'ऐ जिंदगी गले लगा ले', 'लगी आज सावन की' या सुरेश वाडकर यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांनी अनेत   भावगीते, भक्ती गीते देखील गायली.  मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील त्यांची गाणी लोक आवडीनं ऐकतात. तसेच सुरेश वाडकर हे गाण्यांचे कार्यक्रमांचे परीक्षण देखील करतात.   त्यांनी 'मेरी किस्मत में तू नहीं साहेब', 'मैं हूं प्रेम रोगी' यांसारखी मधुर गाणी मनोरंजन विश्वाला दिली. 

‘सूर आनंदघन’, ‘ओमकार स्वरूपा’, ‘विठ्ठल आवडी प्रेमभावो’, ‘देवाचिये द्वारी’ अशी भक्तीगीते ऐकून श्रोते देवाच्या चरणी लीन झाले. ‘प्रेमरोग’, ‘सदमा’ अशा चित्रपटातील त्यांची गाणी खूप गाजली. संगीतविश्वातील अमुल्य योगदानासाठी सुरेश वाडकर यांना 2020मध्ये 'पद्मश्री' पुरस्कारही देण्यात आला.

संबंधित बातम्या

Kedar Shinde : रंगभूमीवर प्रेम अन् सिनेमाला श्वास मानणाऱ्या, तर बाईपण खरंच भारी हे कळलेल्या केदार शिंदेंचा 'माझा सन्मान' पुरस्कारानं गौरव

 

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget