Taali: लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार; सुष्मिताची 'ताली' मराठी सेलिब्रिटींची
'ताली' (Taali) या वेब सीरिजचा दिग्दर्शक आणि लेखक देखील मराठी आहे. जाणून घेऊयात ताली या वेब सीरिजच्या टीमबाबत...
![Taali: लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार; सुष्मिताची 'ताली' मराठी सेलिब्रिटींची Marathi celebrities in Tali web series Sushmita Sen know about team Taali: लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार; सुष्मिताची 'ताली' मराठी सेलिब्रिटींची](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/14/f047b50f123ab70d48427025f0eb46a31691995577192259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Taali: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) 'ताली' (Taali) या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या वेब सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. या वेब सीरिजमध्ये काही मराठी देखील कलाकारांनी देखील काम केलं आहे. तसेच या वेब सीरिजचा दिग्दर्शक आणि लेखक देखील मराठी आहे. जाणून घेऊयात ताली या वेब सीरिजच्या टीमबाबत...
'ताली' मध्ये या मराठी कलाकारांनी
अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi), अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi) या मराठी कलाकारांनी ताली या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. सुव्रत आणि हेमांगी यांचा ताली या वेब सीरिजमधील अभिनय बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सुव्रत जोशी हा या चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर देखील ताली या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे, असंही म्हटलं जात आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी ताली या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं लेखन क्षितिज पटवर्धन यांनी केलं आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेननं ताली या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला तिनं कॅप्शन दिलं, 'गौरी आली. आपल्या स्वाभिमान, आदर आणि स्वातंत्र्याची कथा घेऊन. ताली - बजाएंगे नही, बजवाएंगे!' सुष्मितानं शेअर केलेल्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता. ताली वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये सुष्मिता सेनचा डायलॉग ऐकू येतो, 'जिस देश में कुत्तों तक का सेंसेस होता है पर ट्रांसजेंडर्स का नहीं! ऐसे लोगों के बीच जीना, दॅट इस स्केरी..'
सुष्मिता सेनची ताली ही वेब सीरिज 15 ऑगस्ट रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. ही वेब सीरिज JioCinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजमधील गौरीची कथा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
वाचा इतर सविस्तर बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)