Malaika Arora चं फिटनेस रुटिन; शेअर केलं टोन्ड बॉडीचं गुपित
मलायकाच्या या टोन्ड बॉडीच्या रहस्यामागे तिचा एक खास फिटनेस मंत्र आहे. मलायकाचं फिटनेस मंत्र कोणीही अगदी सहज आपल्या डेली रूटीनमध्ये समावेश करू शकतं.
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. पण तिच्या या सुदंर टोन्ड बॉडीचं रहस्य म्हणजे तिची अथक मेहनत आहे. मलायका दररोज वर्कआउट करते. त्याचबरोबर ती आपल्या डाएटची देखील खूप काळजी घेते. मलायका स्वत:ला फिट राखण्यासाठी व्यायामासोबतच योगा करते. ती सोशल मीडियावर आपले योगा करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करते तसेच आपल्या चाहत्यांना फिट राहण्याचे आवाहन करते. तिच्या व्हिडिओंना चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. मलायकाच्या या टोन्ड बॉडीच्या रहस्यामागे तिचा एक खास फिटनेस मंत्र आहे. मलायकाचं फिटनेस मंत्र कोणीही अगदी सहज आपल्या डेली रूटीनमध्ये समावेश करू शकतं.
View this post on Instagram
मलायकाची फिगर, फ्लॅट बेली आणि लूकचे आज लाखो चाहते आहेत. एका मुलाखतीत मलायका म्हणाली होती की, आपले शरीर एक मंदिर आहे, आपण त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे आणि दररोज आपल्या फिटनेससाठी थोडा वेळ काढला पाहिजे. मलायका अरोराच्या डाएट प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर तिला घरात बनवलेलं साधं जेवण खायला आवडतं. तसेच मलायका जास्त कॅलरी असेलेले पदार्थ खाणे टाळते. मीडिया रिपोर्टनुसार मलायका दिवसाची सुरुवात डिटॉक्स वॉटरने करते. या डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी ती गरम पाण्यात लिंबू आणि मध घालते.
मलायकाला ब्रेकफास्टमध्ये उपमा आणि पोहा यांसारखे साउथ इंडियन पदार्थ खायला आवडते. संध्याकाळच्या वेळी जेव्हा तिला भूक लागते तेव्हा ती ताज्या भाजीचा रस किंवा ब्राउन ब्रेड टोस्ट खाते. मलायकाला लंचमध्ये भाज्या, कोशिंबीर, मासे किंवा चिकन यांच्यासह भात खायला आवडतो. मलायका कायम रात्रीचं जेवण हे कमी करते. ती रात्रीच्या जेवणात वाफवलेल्या भाज्या आणि सलाड यांच्यासह तूप खाते. मलाइका दिवसभर कितीही व्यस्त असली तरी ती दररोज वर्कआउट करते. मलायकाच्या व्यायामामध्ये कार्डिओ, योगा यांचा समावेश असतो.
View this post on Instagram
काय आहे मलायका अरोराच्या सौंदर्याचं गुपित?
मलायकाने इन्स्टाग्रामवरून या ब्युटी टिप्स आपल्या फॅन्ससोबत शेअर केल्या आहेत. ज्या कोणीही अगदी सहज वापरू शकतं. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'कोण म्हणतं कॉफी शरीरासाठी घातक ठरते, या टिप्सच्या मदतीने तुमच्या व्हिलनचं रुपांतर हिरोमध्ये करा.'
मलायकाने कॉफीच्या योग्य वापराबाबत सांगताना लिहिलं आहे की, 'बॉडी स्क्रब : उरलेल्या कॉफी ग्राउंडला थोडी ब्राऊन शुगर आणि खोबऱ्याच्या तेलासोबत एकत्र करा. त्वचेवर लावा. हे झटपट होणारं आणि सुगंधी घरगुती स्क्रब आहे. कॉफीमध्ये असलेल्या कॅफेनमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे त्वचेचं सुर्याच्या प्रखर किरणांपासून रक्षण करतात. त्यामुळे त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासही मदत होते.'