एक्स्प्लोर
काँग्रेसची गुंडगिरी तुमच्या परवानगीने? मधुर भांडारकर यांचा राहुल गांधींना सवाल
या सर्व प्रकारानंतर मधुर भांडारकर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना काही सवाल केले आहेत. पुण्यानंतर नागपुरातीलही पत्रकार परिषद रद्द करावी लागली. या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? असे सवाल राहुल गांधींना केले आहेत.
![काँग्रेसची गुंडगिरी तुमच्या परवानगीने? मधुर भांडारकर यांचा राहुल गांधींना सवाल Madhur Bhandarkar Asks Question To Rahul Gandhi Over Indu Sarkar Latest Updates काँग्रेसची गुंडगिरी तुमच्या परवानगीने? मधुर भांडारकर यांचा राहुल गांधींना सवाल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/16135719/rahul-gandhi-madhur-bhandarkar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : काँग्रेसने पुण्यानंतर नागपुरातही इंदू सरकारचं प्रमोशन होऊ दिलं नाही. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी नागपुरात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय मधुर भांडारकर यांनी घेतला.
या सर्व प्रकारानंतर मधुर भांडारकर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना काही सवाल केले आहेत. पुण्यानंतर नागपुरातीलही पत्रकार परिषद रद्द करावी लागली. या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? असे सवाल राहुल गांधींना केले आहेत.
काय आहे वाद?
मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा सिनेमा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. मात्र या सिनेमात काँग्रेसची बदनामी करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. शिवाय हा सिनेमा भाजपने स्पॉन्सर केल्याचा दावाही काँग्रेसने केलाय. ज्यामुळे काँग्रेसकडून सिनेमाला विरोध केला जात आहे.
अभिनेते अनुपम खेर, नील नितीन मुकेश यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. नील नितीन मुकेश या सिनेमात दिवंगत काँग्रेस नेते संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
आणीबाणीच्या काळात नागरिकांना झालेला त्रास आणि देशातील आणीबाणीची परिस्थिती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होईल.
संबंधित बातम्या :
इंदू सरकारचं पुण्यातील प्रमोशन काँग्रेसनं हाणून पाडलं
सिनेमेनिया : ‘इंदू सरकार’ काँग्रेसविरोधी आहे का?
‘इंदू सरकार’ न दाखवता रिलीज केल्यास कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील: विखे
इंदू सरकार, संजय गांधी आणि ‘ती’!
‘इंदू सरकार’ला नोटीस पाठवणारी ‘प्रिया सिंग पॉल’ कोण?
‘इंदू सरकार’च्या निर्मात्यांना नोटीस, सिनेमाच्या बंदीची मागणी
आणीबाणीवर आधारित ‘इंदू सरकार’चा ट्रेलर रिलीज
‘इंदू सरकार’चा ट्रेलर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
भारत
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)